May 5, 2024

अखिल भारतीय एसएनबीपी स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग

पुणे २७ सप्टेंबर २०२३ – एस.ई. सोसायटीच्या एसएनबीपी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील १६ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत या वर्षी देखिल १५ राज्यांनी सहभाग नोंदवला आहे. यंदा या स्पर्धेचे हे सातवे पर्व असेल.

गेल्यावर्षीप्रमाणेच मुला आणि मुलींची स्पर्धा एकत्रित खेळविण्यात येणार असून, दोन्ही स्पर्धा मिळून एकत्रित ३.८० लाख रुपयाची पारितोषिके दिली जाणार आहेत. गेल्यावर्षीपासूनच ही प्रथा सुरु करण्यात आली होती. या वर्षी देखिल यात काही बदल होणार नाही. मुलींची स्पर्धा ही अखिल भारतीय महिला विजेतेपदासाठी असून, या स्पर्धेचे हे पाचवे पर्व आहे. मुलांच्या गटातील विजेत्यास १ लाख, उपविजेत्यास ५० हजार, तर तिसऱ्या क्रमांकासाठी ३० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. महिला गटात हीच पारितोषिक रक्कम अनुक्रमे ७५ हजार, ५० हजार आणि ३० हजार अशी निश्चित करण्यात आली आहे.

मुलांच्या विभागातील स्पर्धेता १ ऑक्टोंबरपासून म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात होईल. महिलांची स्पर्धा ४ ऑक्टोबरपासून संस्थेच्या चिखली-मोशी येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर होणार आहे. अंतिम सामना ४ ऑक्टोबर रोजी होईल.

स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना ई गटातून कोलकाता वॉरियर्स आणि भोंगोर हॉकी अकादमी यांच्यात खेळविला जाईल. य स्पर्धेला हॉकी इंडियाची मान्यता असून, स्पर्धेतील सहबागी २४ संघांना ८ विभागात विभागण्यात आले आहे. अव्वल स्थानावारील संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

स्पर्धेच्या आयोजक आणि एसएनबीपी समूहाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या, तळागाळातील प्रत्येक खेळाडू हॉकी खेळला पाहिजे हे आमचे उद्दिष्ट आहे. खेळाडूंनी खेळाकडे एक व्यासपीठ म्हणून बघताना आपल्यातील प्रतिभेला सक्षम बनविण्याची गरज आहे. या स्प़र्धेची दरवर्षी खेळाडू वाट बघत असतात हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

राज्य आणि शहरात १६ वर्षांखालील गासाठी राष्ट्रीय स्तरावर होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. या पर्वात दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश (उत्तर), राजस्थान, महाराष्ट्र (पश्चिम) , तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, (दक्षिण) आणि ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, झारखंड (पूर्व) या राज्यातील संघ सहभागी होणार आहे.

यजमानांच्या एसएनबीपीचे प्रतिनिधीत्वल एसएनबीपी अकादमी करेल. पुण्यातील केवळ या एकाच संघाचा सहभाग असून, अन्य संघ नाशिक आणि मुंबई येथील आहेत.

महिला हॉकी स्पर्धा बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. महिला विभागात ध्यानचंद अकादमी, हॉकी कोल्हापूर, गतवर्षीचे उपविजेते हॉकी नाशिक, 2022 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेले रोव्हर्स अकादमी हॉकी जळगाव, साई-औरंगाबाद, ग्रासरूट्स हॉकी आणि सोलापूर हॉकी या संघांचा समावेश आहे.

स्पर्धा संयोजक फिरोज शेख म्हणाले, “अकादमी आणि शालेय कलागुणांचे एकत्र मिश्रण असून, खेळाडूंच्या कौशल्याला वाव देणार आहे. या स्पर्धेत सहभागी हॉकी इंडियाच्या २५ तांत्रिक अधिकाऱ्यांशिवाय ४८० खेळाडूंचा समावेश असोल. एकूण ३५ सामने खेळविले जाणार आहेत . अनेक वर्षांपासून या स्पर्धेच्या यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी इंडिया या दोघांचेही आभारी आहोत.”

या पूर्वीचे विजेते –
२०१६ : एमपी अकादमी (विजेता); शहीद बिशन सिंग स्कूल, दिल्ली (उपविजेते), क्रीडा प्रबोधिनी (तृतीय स्थान)

२०१७ एमपी अकादमी (विजेता); क्रीडा प्रबोधिनी (उपविजेते); हॉकी कुर्ग (तृतीय स्थान)

२०१८ : क्रीडा प्रबोधिनी (विजेता); एमपी अकादमी (उपविजेते); भिवानी जय भारत अकादमी, हरियाणा (तृतीय स्थान)

२०१९ : एमपी हॉकी अकादमी (विजेता); शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी), अमृतसर (उपविजेते); सेल हॉकी अकादमी (तृतीय स्थान)

२०२० : कोविड १९ संसर्गामुळे आयोजन नाही.

२०२१ : सेल हॉकी अकादमी, ओडिशा (विजेता); एचएआर हॉकी अकादमी, सोनीपत (उपविजेते); एसएनबीपी अकादमी, पुणे (तृतीय स्थान)

२०२२ : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी ), अमृतसर (विजेता), ध्यानचंद अकादमी (उपविजेते), अन्वर हॉकी सोसायटी (तृतीय)