पुणे, 4 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्टस किंगडम आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत शहरांतील 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे 5 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत युकेएम एफसी, लौकिक एफसी, चोंदे पाटील, फाल्कन्स, युकेएम एफसी ब, हॉटफुट, गो प्रो, 4लायन्स बावधन, 4लायन्स अ आणि ब हे संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा कुमार गटात होणार आहे. तसेच हि स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याचे सनी स्पोर्टस वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले.
More Stories
एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरिज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात नितीश बेलुरकर आघाडीवर
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेस आज(20 एप्रिल)पासून प्रारंभ