पुणे, 5 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्टस किंगडम आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या वतीने कै विनायक निम्हण मेमोरियल जिल्हा बडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सनी स्पोर्टस वर्ल्ड बॅडमिंटन हॉल ,पाषाण सुस रोड येथे 12 ते 15 ऑगस्ट 2023या कालावधीत रंगणार आहे. टनपटूंनी
ही स्पर्धा 11, 13, 15, 16, 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात, तसेच 15, 17, 18 वर्षाखालील मिश्र गटात होणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक असून नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे. नावनोंदणी https://pdmba.zeetius.com या सांकेतिक स्थळावर करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
एमएसएलटीए हॉटेल रवाईन अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय सिरिज 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात नितीश बेलुरकर आघाडीवर
तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेस आज(20 एप्रिल)पासून प्रारंभ