April 28, 2024

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांसह १९ जणांना पकडले

पुणे, पुणे, ०१ सप्टेंबर २०२३ : पुणे पोलिसांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ बांगलादेशी नागरिकांना पकडले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत ही कारवाई केली. या कारवाईत १० महिलांसह १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार पेठ भागातील वेश्यावस्तीतील कुंटणखान्यात बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या समाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. दलालांनी बांगलादेशी महिलांना आमिष दाखवून त्यांची विक्री केली होती. बांगलदेशी महिलांबरोबर त्यांचे निकटवर्तीय वेश्यावस्तीत वास्तव्य करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्यावस्तीत छापा टाकून १० बांगलादेशी महिलांसह १९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम १९५० चे कलम, तसेच पककीय नागरिक आदेश १९७८ कलमांन्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात अलाा. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब कर्पे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण, अमित जमदाडे, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.