May 7, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत यशवी, व्हॅरोक संघांचा सहज विजय

पुणे, 23 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत यशवी संघाने व्हिजन संघाचा सर्व 10 गडी राखून तर व्हॅरोक संघाने स्पोर्टिव्ह संघाचा 148 धावांनी सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना व्हिजन संघ 28.3 षटकांत सर्वबाद 39 धावांत गारद झाला. आदित्य हिरेने 13 धावात 5 तर महेश्वर वाघने 15 धावात 4 गडी बाद केले. 39 धावांचे लक्ष अभिनव गायकवाडच्या नाबाद 22 व गौरव गायकवाडच्या नाबाद 9 धावांसह यशवी संघाने केवळ 3.3 षटकांत एकही गडी न गमावता 43 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. 13 धावात 5 गडी बाद करणारा आदित्य हिरे सामनावीर ठरला.

व्हिजडम क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात अथर्व औटेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक संघाने स्पोर्टिव्ह संघाचा 148 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना व्हेरॉक संघाने 50 षटकांत 7 बाद 320 धावांचा डोंगर रचला. अथर्व वैद्यने 121 चेंडूत 14 चौकारांसह 97 व अथर्व औटेने 87 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारांसह 94 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. प्रज्वल मोरेने 40 धावा करून दोघांना सुरेख साथ दिली. 320 धावांच्या आव्हानाचा सामना करताना अथर्व वैद्य, आलोक लोढा व अथर्व औटे यांच्या अचूक गोलंदाजीने स्पोर्टिव्ह संघाचा डाव 38.2 षटकात सर्वबाद 172 धावांत रोखला. 94 धावा व 2 गडी बाद करणारा अथर्व औटे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
व्हिजन: 28.3 षटकांत सर्वबाद 39 धावा (आशय शेडगे 7, शर्विल गोसावी 7, आदित्य हिरे 5-13, महेश्वर वाघ 4-15, शौर्य पाटील 1-1) पराभूत वि यशवी: 3.3 षटकांत बिनबाद 43 धावा (अभिनव गायकवाड नाबाद 22 (18,5×4), गौरव गायकवाड नाबाद 9 (5,2×4)सामनावीर -आदित्य हिरे
यशवी संघ 10 गडी राखून विजयी

व्हॅरोक: 50 षटकांत 7 बाद 320 धावा (अथर्व वैद्य 97(121,14×4), अथर्व औटे 94(87,11×4,2×6), प्रज्वल मोरे 40(38,5×4), श्रेयस शिवरकर 25(23,1×4,1×6), रुहुल्ला नदाफ 18(12), वरद पिंपळपुरे 2-31, अर्जुन पवार 2-68) वि.वि स्पोर्टिव्ह : 38.2 षटकात सर्वबाद 172 धावा(आरुष सिंग 36(51,6×4), अर्जुन पवार 30(59,6×4), अथर्व वैद्य 2 -16, आलोक लोढा 2-30, अथर्व औटे 2-31) सामनावीर- अथर्व औटे
व्हॅरोक संघ 148 धावांनी विजयी