पुणे, 18 मार्च 2023: एएनपी कॉर्पोरेशनच्या वतीने आणि रनबडीज रेसेस यांच्या सहकार्याने आयोजित एएनपी रन पुणे रन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत 2200 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा आज रविवार, 19 मार्च 2023 रोजी एएनपी पुनावळे प्रोजेक्ट, औंध रावेत बीआरटीएस रोड, पुनावळे या ठिकाणी पार पडणार आहे.
स्पर्धेतील फुल(पूर्ण)मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ 3.30 वाजता, तर अर्धमॅरेथॉन स्पर्धेचा फ्लॅगऑफ सकाळी 5:30 वाजता होणार आहे. फुल(पूर्ण)मॅरेथॉनसाठी 2 लूप असणार असून अर्धमॅरेथॉन शर्यतीसाठी 1 लूप असणार आहे.
आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी आणि दिर्घकाळापासून आर्थिक साहाय्यपासुन वंचित राहिलेल्या समाजातील दुर्लक्षित वर्गाला किडनी डायलिसिस सारख्या अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे असा हा या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला प्रायोजित करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे मनोहर फेरवानी यांनी सांगितले.
एएनपी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक समीर आडवानी म्हणाले की, या अर्धमॅरेथॉनबरोबरच 10किमी, 5किमी आणि 3किमी अशा विविध गटातील शर्यती तसेच फन रन आणि वॉक असणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला शर्यतीचा खास टीशर्ट, फिनिशर मेडल, गुडी बॅग, टायमिंग चीप, ब्रेकफास्ट किट आणि हायड्रेशन याबरोबरच रुट सपोर्ट आणि ई- सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन