June 14, 2024

एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एफसी गन्स अँड रोजेस, सोलारिस ईगल्स संघांचे विजय

पुणे, 18 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गटसाखळी फेरीत एफसी गन्स अँड रोजेस, सोलारिस ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
 
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गट 5 मध्ये एफसी गन्स अँड रोजेस संघाने एमडब्ल्यूटीए 2 संघाचा 24-05 असा पराभव केला. 100अधिक गटात एफसी संघाच्या संजय रासकर व सचिन साळुंखे यांनी एमडब्ल्यूटीएच्या मिलिंद घैसास व रितेश चौधरी यांचा 6-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाचे खाते उघडले. 90 अधिक गटात एफसी संघाच्या संग्राम चाफेकरने मनोज देशपांडेच्या साथीत प्रमोद उमरजे व माधव देशपांडे यांचा 6-1 असा, तर खुल्या गटात एफसी संघाच्या तुषाल थवानी व धनंजय कवडे यांचा आशिष अरोरा व अमेय पुराणिक यांचा 6-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवुन दिली. अखेरच्या खुल्या गटाच्या लढतीत एफसी संघाच्या पुष्कर पेशवा व पंकज यादव या जोडीने योगेश कल्पे व मिलिंद घैसास यांचा 6-0 असा पराभव संघाला विजय मिळवून दिला. 
 
दुसऱ्या सामन्यात संजीव घोलप, रवी कात्रे, सिद्धू बी., गिरीश साने, अन्वीत पाठक, निनाद वाहीकर, सिद्धार्थ जोशी, अमोल गायकवाड यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सोलारिस ईगल्स संघाने पीवायसी कॅनन्स संघाचा 24-01 असा सहज पराभव केला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी: 
गट 5: एफसी गन्स अँड रोजेस वि.वि.एमडब्ल्यूटीए 2 24-05(100अधिक गट: संजय रासकर/सचिन साळुंखे वि.वि.मिलिंद घैसास/रितेश चौधरी 6-5; 90 अधिक गट: संग्राम चाफेकर/मनोज देशपांडे वि.वि.प्रमोद उमरजे/माधव देशपांडे 6-1; खुला गट: तुषाल थवानी/धनंजय कवडे वि.वि.आशिष अरोरा/अमेय पुराणिक 6-0; खुला गट: पुष्कर पेशवा/पंकज यादव वि.वि.योगेश कल्पे/मिलिंद घैसास 6-0);
 
गट 3: सोलारिस ईगल्स वि.वि.पीवायसी कॅनन्स 24-01(100  अधिक गट: संजीव घोलप/रवी कात्रे वि.वि.चकोर गांधी/अरुण नायर 6-0; 90 अधिक गट: सिद्धू बी./गिरीश साने पुढे चाल वि. विनायक भिडे/हरीश गलानी 6-0; खुला गट: अन्वीत पाठक/निनाद वाहीकर वि.वि.राहुल रोडे/चिन्मय चिरपुटकर 6-1; खुला गट: सिद्धार्थ जोशी/अमोल गायकवाड वि.वि.शंकर भगत/विनायक भिडे 6-0).