पुणे, दि. ०६/०६/२०२३: गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्यासाठी पुण्यात नवीन तब्बल २ हजार ८८० सीसीटीव्हींद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी मागील १० वर्षात घडलेल्या गुन्हयांचा आढावा घेतला आहे. त्याअनुषंगाने जबरी चोरी, लुटमार, मारामारी, चोरी, अपघातांवर बारकाईने माहिती मिळण्यास मदत होणार आहे. आस्थापनांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या फायबर ऑप्टीक कनेक्शनला जोडले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात भेटीवेळी सेठ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.
रजनीश शेठ म्हणाले, पुण्यात सध्यस्थितीत १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. संबंधित सीसीटीव्ही प्रामुख्याने वाहतूकीच्या दुष्टीकोनातून बसवले असून गुन्ह्यांच्या तपासाच्या दुष्टीने सीसीटीव्हींचा उपयोग होतो. दरम्यान, पुणे पोलिसांनी मागील १० वर्षात घडलेल्या गुन्हेगारीचा आढावा घेतला आहे. ज्याठिकाणी सातत्याने गुन्हे घडले आहेत, त्याठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. संबंधित सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहेत. नव्याने २ हजार ८८० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही बसविण्यासाठी दुकानदारांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यांना दुकानाबाहेर सीसीटीव्ही बसविण्याची विनंती केली जाणार आहे. संबंधित सीसीटीव्हींचे कनेक्शन पोलिसांच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १० हजारांवर सीसीटीव्ही आस्थापनांकडून बसविण्याचे उदिष्ट आहे.
औद्योगिक गुन्हेगारी थांबविणे, सायबर गुन्ह्यांसाठी प्राधान्य
राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यांना आधुनिक सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यामुळे प्राप्त तक्रारींवर अभ्यास करुन तातडीने तपासाला गती मिळणार आहे. दरम्यान, औद्योगिक कंपन्यांमध्ये वाढती गुन्हेगारी संपुष्टात आणणे, खंडणीखोरांविरुद्ध कारवाई करण्यावर भर दिला असल्याचे रजनीश सेठ यांनी सांगितले.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर