पुणे , ११ मार्च २०२३ : ३२व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) इंटर-युनिट बुद्धिबळ स्पर्धेत युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा ७व्या फेरी अखेरीस ६ गुणांनी आघाडीवर आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित ३२व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेच्या वैयक्तिक सामन्यांची प्राथमिक स्तरावरील ७ फेऱ्या शनिवारी संपन्न झाल्या. या सामान्यांची सुरुवात कोल्हापूर येथील पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. स्पर्धेत एकूण ७४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. एकूण ९ फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या ७ फेऱ्या शनिवारी संपन्न झाल्या. तर उर्वरित दोन फेऱ्या उद्या होणार आहेत.
स्पर्धेत आज सातव्या फेरी अखेरीस इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हे ६ गुणांनी प्रथम स्थानावर आहे. तर इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्रँड मास्टर मुरली कार्थिकेयन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे मास्टर मित्रभा गुहा,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे ग्रँड मास्टर जी एन गोपाल आणि इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्रँड मास्टर बी अधिबान हे चारही खेळाडू प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
सातव्या फेरीत,ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद आणि ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन (१/२-१/२) तसेच ग्रँडमास्टर मित्रभा गुहा व ग्रँडमास्टर जीएन गोपाल (१/२-१/२) यांच्यामध्ये बरोबरीचा सामना झाला. तर ग्रँडमास्टर बी अधिबानने ग्रँडमास्टर विदित गुजराती यांच्यावर १-० ने मात केली.
सातव्या फेरीअखेरीस पहिल्या १० स्थानातील खेळाडू व त्यांचे गुण :
१) आर प्रग्नानंध (6 गुण),
२) मुरली कार्तिकेयन (5.5 गुण)
३) मित्रभा गुहा (5.5 गुण)
४) जी एन गोपाल (5.5 गुण)
५) बी अधिबन (5.5 गुण)
६) वैभव सुरी (5 गुण)
७) अभिजित गुप्ता (5 गुण),
८) पद्मिनी राउत (5 गुण),
९) एसएस गांगुली (5 गुण)
१०) रौनक साधवानी (5 गुण)
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन