पुणे, 5 एप्रिल 2024: मंदार वाकणकर टेनिस अकादमीव गोल्ड लिफ यांच्या व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली तर्फे टीपीएल – पीएमडीटीए खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 6 ते 7 एप्रिल 2024 या कालावधीत मंदार वाकणकर टेनिस अकादमी येथे होणार आहे.
स्पर्धेत शहरातून 68 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा पुरूष व महिला एकेरी व दुहेरी गट, 35 वर्षांवरील गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक मंदार वाकणकर यांनी दिली.a

More Stories
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी