May 2, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत डॉइश बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 4 एप्रिल, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डॉइश बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संघांनी अनुक्रमे कॉग्निझंट व एफआयएस ग्लोबल या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पंकज लालगुडे नाबाद 62 धावांच्या खेळीच्या जोरावर डॉइश बँक संघाने कॉग्निझंट संघाचा 29 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डॉइश बँक संघाने 20 षटकात 3बाद 188 धावांचे आव्हान उभे केले. यात पंकज लालगुडेने 40चेंडूत 7चौकार व 2 षटकारासह नाबाद 62 धावा केल्या. त्याला अनिल तेवानी 49धावा, सुमित फोपटे नाबाद 37 धावा, मधु कामत 31 धावा काढून साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघाला 20 षटकात 8बाद 159धावाच करता आल्या. यात अर्पित राय 23, संदीप राज 22, पियुष पवार 21, राकेश चव्हाण 18, पुनीत करण 17 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.  डॉइश बँक संघाकडून दिपक मेहतो(2-28),अमोल माने(2-31), सुमित फोपटे(1-13), अनिल तेवानी(1-28)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 29 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात मिन्हज अली(3-24) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) संघाने एफआयएस ग्लोबल संघाचा 5गडी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
 
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
डॉइश बँक: 20 षटकात 3बाद 188धावा(पंकज लालगुडे नाबाद 62 (40,7×4,2×6), अनिल तेवानी 49 (29,9×4), सुमित फोपटे नाबाद 37 (19,1×4,3×6), मधु कामत 31(27, 5×4), राकेश चव्हाण 2-22)वि.वि.कॉग्निझंट: 20 षटकात 8बाद 159धावा(अर्पित राय 23, संदीप राज 22, पियुष पवार 21, राकेश चव्हाण 18, पुनीत करण 17, दिपक मेहतो 2-28, अमोल माने, 2-31 सुमित फोपटे 1-13, अनिल तेवानी 1-28); सामनावीर-पंकज लालगुडे; डॉइश बँक संघ 29 धावांनी विजयी;
एफआयएस ग्लोबल: 20 षटकात 8बाद 118धावा(निशीथ गुप्ते 34(26,4×4), त्रिदीप महातो 22, अमित चौहान 12, मिन्हज अली 3-24, सुनील बाबर 2-21, विक्रांत बांगर 1-10)पराभुत वि.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 18.2 षटकात 5बाद 124धावा(साईनाथ शिंदे 32(32,2×4,1×6), विप्लव जुनघरे नाबाद 32(27,3×4,1×6), विक्रांत बांगर 22, आदित्य लहाने 11, ऋत्विक महाजन 1-15, निखिल भुजबळ 1-15); सामनावीर- मिन्हज अली; टीसीएस संघ 5गडी राखून विजयी.