May 3, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत केपीआयटी व टीसीएस यांच्यात अंतिम लढत

पुणे, 06 एप्रिल, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत केपीआयटी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) या संघांनी अनुक्रमे यार्डी व डॉइश बँक या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात मयुरेश लिखिते(2-19 व नाबाद 42) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केपीआयटी संघाने यार्डी संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना प्रीतम गुजरे 37(34,3×4,1×6), सौरभ देवरे 29, अमेय पडे 13, आशु शेख 11 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर यार्डी संघाने 20 षटकात 8बाद 126धावा केल्या. केपीआयटीकडून पार्थ गायकवाड(2-18), मयुरेश लिखिते(2-19), सुधीर काळे(2-33), संतोष कंक(1-12) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान केपीआयटी संघाने 18.1 षटकात 4बाद 130धावा करून पूर्ण केले. यात अक्षय बढेने 43चेंडूत 5चौकारांसह नाबाद 42धावा, मयुरेश लिखितेने 21चेंडूत 2चौकार व 3 षटकारासह नाबाद 42धावा, मंगेश पाटीलने 38 धावा काढून संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा मयुरेश लिखिते सामन्याचा मानकरी ठरला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत आदित्य लहाने नाबाद 48 धावांच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने डॉइश बँक संघावर 11 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने 20 षटकात 6बाद 177धावाचे आव्हान उभे केले. यात विक्रांत बांगरने 49चेंडूत 10चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 75 धावांची खेळी केली,. त्याला आदित्य लहानेने 27चेंडूत 5चौकार व 2 षटकारासह नाबाद 48, विप्लव बांगर 24, साईनाथ शिंदे 11, सागर दुबे 11 धावा काढून साथ दिली. याच्या उत्तरात डॉइश बँक संघाला 20 षटकात 7बाद 166धावाच करता आल्या. यात पंकज लालगुडे 38, अमोल माने 30, नीलेश परिहार 23, श्रेयस तिवारी 22, अनिल तेवानी 14, सुमित फोपटे 13 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. टीसीएसकडून प्रवीण राऊत(2-22), सागर दुबे(2-31), सुनील बाबर(2-44) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

निकाल: उपांत्य फेरी:
यार्डी: 20 षटकात 8बाद 126धावा(प्रीतम गुजरे 37(34,3×4,1×6), सौरभ देवरे 29, अमेय पडे 13, आशु शेख 11, पार्थ गायकवाड 2-18, मयुरेश लिखिते 2-19, सुधीर काळे 2-33, संतोष कंक 1-12) पराभुत वि.केपीआयटी: 18.1 षटकात 4बाद 130धावा(अक्षय बढे नाबाद 42(43,5×4), मयुरेश लिखिते नाबाद 42(21,2×4,3×6), मंगेश पाटील 38(32,6×4,1×6) , गौतम तुळपुळे 2-21);सामनावीर-मयुरेश लिखिते; केपीआयटी संघ 6 गडी राखून विजयी;

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 20 षटकात 6बाद 177धावा(विक्रांत बांगर 75(49,10×4,3×6), आदित्य लहाने नाबाद 48(27,5×4,2×6), विप्लव बांगर 24, साईनाथ शिंदे 11, सागर दुबे 11, तरण दीप सिंग 2-30, अमोल माने 2-47) वि.वि.डॉइश बँक: 20 षटकात 7बाद 166धावा(पंकज लालगुडे 38(20,6×4,1×6), अमोल माने 30(17,3×4,2×6), नीलेश परिहार 23, श्रेयस तिवारी 22, अनिल तेवानी 14, सुमित फोपटे 13, प्रवीण राऊत 2-22, सागर दुबे 2-31, सुनील बाबर 2-44, दीपक शर्मा 1-23); सामनावीर-आदित्य लहाने; टीसीएस संघ 11 धावांनी विजयी.