May 2, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एफआयएस ग्लोबल संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे,  1 एप्रिल, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एफआयएस ग्लोबल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
 
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विक्रांत बांगर(58 धावा व 3-21) याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने यार्डी संघाचा 30 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने 20 षटकात 9बाद 129धावा केल्या. यात विक्रांत बांगरने 52चेंडूत 6चौकार व 1 षटकारासह 58धावा, शुभम कबाडीने 13धावा, आदित्य लहानेने 10धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यार्डी संघाला 20 षटकात 9बाद 99धावाच करता आल्या. यात सौरभ जळगावकर 25, सौरभ देवरे 21 यांनी थोडासा प्रतिकार केला. टीसीएसकडून विक्रांत बांगरने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल दाखवत 21धावात 3 गाडी बाद केले. त्याला पूरब गजिनकर(2-6), प्रवीण राऊत(2-17) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली.
दुसऱ्या सामन्यात निखिल भुजबळ ( नाबाद 74 व 1-30) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एफआयएस ग्लोबल संघाने मर्क्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 20 षटकात 9बाद 129धावा(विक्रांत बांगर 58(52,6×4,1×6), शुभम कबाडी 13, आदित्य लहाने 10, सौरभ देवरे 4-21, गौतम तुळपुळे 2-26, मयूर राठोड 1-2) वि.वि.यार्डी: 20 षटकात 9बाद 99धावा(सौरभ जळगावकर 25, सौरभ देवरे 21, विक्रांत बांगर 3-21, पूरब गाजिनकर 2-6, प्रवीण राऊत 2-17);सामनावीर- विक्रांत बांगर; टीसीएस संघ 30 धावांनी विजयी;
 
मर्क्स: 20 षटकात 8बाद 150धावा(दिनेश वाडकर 40(39,3×4,2×6), रोहन शिंदे 41(26,5×4), प्रतीक डी. 23, शुभंकर गोखले 2-26, अमित चौहान 1-16, निखिल भुजबळ 1-30 )पराभुत वि.एफआयएस ग्लोबल: 19 षटकात 5बाद 151धावा(निखिल भुजबळ नाबाद 74(54,11×4), पियुल वंजारी 33(25,3×4,1×6), ऋत्विक महाजन 16, प्रियांक चौहान 2-24); सामनावीर- निखिल भुजबळ; एफआयएस ग्लोबल संघ 5 गडी राखून विजयी.