May 5, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत केपीआयटी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 30 मार्च, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत केपीआयटी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत बैबभ मिश्रा(1-25 व नाबाद 28) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मर्क्स संघाने व्हेरिटास संघाचा 2 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात शुभम दिघे(65धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने एन्कोरा संघाचा 6 गडी राखून पराभव करत आगेकूच केली.

अन्य लढतीत दत्तात्रय गाडे(4-22) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर केपीआयटी संघाने मास्टरकार्ड संघाचा 29 धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली.

निकाल: साखळी फेरी:
व्हेरिटास: 20 षटकात 5बाद 161धावा(स्वानंद भागवत 28, अमृत आलोक 23, सुमित दिघे 21, प्रणव पवार 17, ऋषी पारेख 17, दिनेश वाडकर 1-19, बैबभ मिश्रा 1-25) पराभुत वि.मर्क्स: 20षटकात 8बाद 162धावा(दिनेश वाडकर 47(28,4×4,3×6), बैबभ मिश्रा नाबाद 28, अनिकेत कुलकर्णी 23, प्रतीक डी. 24, रोहन शिंदे 19, सुमित दिघे 2-19, प्रणव पवार 2-20, कपिल कुरळेकर 2-32); सामनावीर – बैबभ मिश्रा; मर्क्स संघ 2 गडी राखून विजयी;

एन्कोरा: 20 षटकात 7बाद 144धावा(अमोल निगडीकर 57(44,3×4,5×6), आकाश बिऱ्हाडे 22, सौरभ जैन 13, विनित पाठक 1-7, सचिन पिंपरीकर 1-4) पराभुत वि. टेक महिंद्रा:18.4 षटकात 4बाद 145धावा(शुभम दिघे 65(40,10×4,2×6), इशान ठाकूर 19, स्वप्नील सावगावे नाबाद 22, सचिन पिंपरीकर 18, प्रसन्न सावंत 1-16); सामनावीर – शुभम दिघे; टेक महिंद्रा संघ 6 गडी राखून विजयी;

केपीआयटी: 20 षटकात 7बाद 170धावा(मयुरेश लिखिते 33(15,1×4,3×6), शुभम झापडेकर 30(19,6×4), अलोक नागराज 25, सोमेश मर्दाने 22, मंगेश पाटील 18, पवन व्यास 3-38, अभिजित 3-38, अभिजित 23)वि.वि.मास्टरकार्ड: 20 षटकात 9बाद 141धावा(अभिजीत परिदा 71(42,8×4,2×6), शार्दुल कोंबडे 29, दत्तात्रय गाडे 4-22, संतोष कंक 2-25); सामनावीर-दत्तात्रय गाडे; केपीआयटीए संघ 29 धावांनी विजयी.