May 2, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फी बीयु इलेव्हन, कॉग्निझंट, डॉइश बँक संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 2 एप्रिल, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत इन्फी बीयु इलेव्हन, कॉग्निझंट, डॉइश बँक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात समीर कुदळे(3-17) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर इन्फी बीयु इलेव्हन संघाने व्हेरीटास संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात अनिल तेवानी 40धावा व 2-17)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डॉइश बँक संघाने सीजीआय संघाचा 153 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डॉइश बँक संघाने 20 षटकात 4बाद 240धावा केल्या. यात श्रेयस तिवारी 52, सुमित फोपटे नाबाद 42, मधु कामत 41, अनिल तेवानी 40, पंकज लालगुडे 29, नीलेश परिहार नाबाद 22 यांनी धावा केल्या. हे आव्हान सीजीआय संघ पेलू शकला नाही व त्यांचा डाव 16.4 षटकात सर्वबाद 87धावावर संपुष्टात आला. यात अभिजीत शेळके 27, मंदार पाटील 15 यांनी थोडासा प्रतिकार केला. डॉइश बँक संघाकडून तरण दीप सिंग(3-11), अनिल तेवानी(2-17), दीपक मेहतो(2-16), अंकित गुप्ता(2-6) यांनी सुरेख गोलंदाजी करत 153 धावांनी विजय मिळवला.

अन्य लढतीत पियुश पवार(58धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कॉग्निझंट संघाने टेक महिंद्रा संघाचा 4 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

निकाल: साखळी फेरी:
व्हेरीटास: 16.4 षटकात सर्वबाद 63धावा(शुभ्रांत पांडे 13, मंगेश जामदार 12, समीर कुदळे 3-17, यश पालिचा 2-14, सुनील टक्के 2-1) पराभुत वि.इन्फी बीयु इलेव्हन: 7.4 षटकात 3बाद 66धावा( अंजनी कुमार नाबाद 17, हृषीकेश खांडेकर नाबाद 20, सौरभ थोरात 16, अनिल घुगे 2-14);सामनावीर-समीर कुदळे;इन्फी बीयु इलेव्हन संघ 7 गडी राखून विजयी;

डॉइश बँक: 20 षटकात 4बाद 240धावा(श्रेयस तिवारी 52(26,8×4,2×6), सुमित फोपटे नाबाद 42(17,5×4,2×6), मधु कामत 41(24,6×4,1×6), अनिल तेवानी 40(26, 6×4), पंकज लालगुडे 29, नीलेश परिहार नाबाद 22, दीपक सिंग 2-38)वि.वि.सीजीआय: 16.4 षटकात सर्वबाद 87धावा(अभिजीत शेळके 27, मंदार पाटील 15, तरण दीप सिंग 3-11, अनिल तेवानी 2-17 , दीपक मेहतो 2-16, अंकित गुप्ता 2-6);सामनावीर-अनिल तेवानी; डॉइश बँक संघ 153 धावांनी विजयी;

कॉग्निझंट: 20 षटकात 6बाद 172धावा(पियुश पवार 58(44,3×4,5×6), संदीप राज 40(21,2×4,3×6), करण केसरकर 20, पुनीत करण नाबाद 16, राकेश चव्हाण 15, अमितोष निखार 1-29, विकास भाकरे 1-15)वि.वि.टेक महिंद्रा: 20 षटकात 7बाद 168धावा(सचिन पिंपरीकर 60(37,9×4,1×6), नदीम खान 38(23,1×4,4×6), निनाद फटक 27, सचिन गिबिले 15, कुलदीप राठोड 2- 28, संदीप राज 1-13);सामनावीर-पियुश पवार; कॉग्निझंट संघ 4 धावांनी विजयी.