October 13, 2024

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचे (सेट) प्रवेशपत्र उपलब्ध, सेट परीक्षा २६ मार्च रोजी

पुणे, दि.१७/०३/२०२३- सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून या सर्व उमेवारांना  त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील १७ शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले आहे. या परिक्षेसाठीची प्रवेश पत्र दिनांक १६ मार्च २०२३ पासून उमेदवारांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध केली आहेत. तसेच आवश्यक त्या सुचनेसह प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई मेल वर देखील पाठविण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी दिली.
 उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर जाऊन आपल्या लॉग इन मधून आपला नोंदणी क्रमांक टाकून २६ मार्च २०२३ पूर्वी प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्र या शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. २६ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी दहा वाजल्यानंतर कोणत्याही सबबीवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे सेट विभागाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.