पुणे, दि. १६/०३/२०२३: तरुणींच्या तोकड्या कपड्याबाबत टिपन्नी करणे तरुणाला अंगलट आले असून विमानतळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत संबंधिताला अटक केली आहे. ही घटना १५ मार्चला मध्यरात्री एकच्या सुमारास विमाननगरमधील मिथीला सोसायटीनजीक घडली.
सुयश अमर विटकर (वय २३, रा. मिथीला सोसायटी, विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तिची मैत्रिणी १५ मार्चला मध्यरात्री जेवण केल्यानंतर सोसायटी आवारात फिरत होत्या. त्यावेळी सोसायटीत राहणार्या सुयशने फिर्यादीच्या मैत्रिणीला छोटे छोटे कपडे पेहनके आधी रात को घुमती हो अशी टिपन्नी केली. त्यामुळे तरुणीने तुला काय करायचे असे म्हणत सुयशला जाब विचारला. त्यावेळी त्याने तुम अच्छी दिखती हो असे म्हणत तरुणींचा विनयभंग करीत त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिस हवालदार भंडारी तपास करीत आहेत.
More Stories
Pune: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला ‘प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी उड्डाणपूल’ असे नाव द्यावे
धानोरी-चऱ्होली डी.पी. रस्त्यास वनविभागाची मंजुरी; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश
पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार