November 2, 2024

एएनपी रन पुणे रन अर्धमॅरेथॉन 19 मार्च रोजी पुण्यात रंगणार

पुणे, 22 फेब्रुवारी 2023: एएनपी कॉर्पोरेशनच्या वतीने आणि रनबडीज रेसेस यांच्या सहकार्याने येत्या रविवार, 19 मार्च 2023 रोजी एएनपी रन पुणे रन अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी आणि दिर्घकाळापासून आर्थिक साहाय्यपासुन वंचित राहिलेल्या समाजातील दुर्लक्षित वर्गाला किडनी डायलिसिस सारख्या अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे असा हा या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला प्रायोजित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. या अर्धमॅरेथॉनमधील प्रत्येक प्रवेशिकेबरोबरच एएनपी केअर फाउंडेशन येथे विनामूल्य किंवा परवडणाऱ्या दरात डायलिसिस ऊपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मनोहर फेरवानी यांनी सांगितले.

एएनपी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक समीर आडवानी म्हणाले की, या शर्यतीमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात सहभागी होऊन वंचित वर्गाला साहाय्यासाठी सहभागी होण्याचे आव्हान आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना करत आहोत. या अर्धमॅरेथॉनबरोबरच 10किमी, 5किमी आणि 3किमी अशा विविध गटातील शर्यती तसेच फन रन आणि वॉक असणार आहे.

अडवानी पुढे म्हणाले की, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला शर्यतीचा खास टीशर्ट, फिनिशर मेडल, गुडी बॅग, टायमिंग चीप, ब्रेकफास्ट किट आणि हायड्रेशन याबरोबरच रुट सपोर्ट आणि ई- सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. स्पर्धकांना धावण्यासाठी योग्य तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि दुखापती टाळण्यासाठी रनबडीजच्या वतीने 18 मार्च पर्यंत दर शनिवारी सकाळी 6.45 वाजता ए एन पी युनिव्हर्स बालेवाडी हाय स्ट्रीट बालेवाडी येथे प्रशिक्षक जिंतेंद्र चौधरी तसेच तज्ञ जीओ थॉमस व विवेक साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गिनीज विक्रमवीर आणि ला अल्ट्रा 555किलोमीटर शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय आशिष कसोदेकर आणि आयजी कृष्णा प्रकाश हे या शर्यतीचे रेस अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती रन बडीज रेसेसचे शिल्पा गोपीनाथ व अरविंद बिजवे यांनी दिली.

शर्यतीसाठीचा वैद्यकीय साहाय्य लाईफ पॉइंट हॉस्पिटल यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे डॉ राकेश निवे यांनी सांगितले.

स्पर्धकांना नावनोंदणी https://www.runpunerun.com  या संकेतस्थळावर करता येणार आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क: 9370015930 / 9372846475 / 89753 19545 | 9356328972