June 14, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स,चंद्रोज् संघांचा विजय

पुणे, 21 फेब्रुवारी 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स संघाने  यशवी   संघाचा तर चंद्रोज् संघाने स्पोर्टिव्ह संघाचा प्रत्येकी 72 धवांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात प्रध्युमन कोळीच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर आर्यन्स संघाने यशवी संघाचा 72 धावांनी पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना शौनक शेवडेच्या अर्धशतकी खेळीसह आर्यन्स संघाने 50 षटकांत 7 बाद 134 धावा केल्या. 134 धावांच्या आव्हानाचा सामना करताना प्रद्युमन कोळीच्या अचूक गोलंदाजीपुढे यशवी संघ 26.4 षटकांत सर्वबाद 62 धावांत गारद झाला. प्रद्युमनने कावळ 19 धावात 7गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

वाळके स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात श्रावण गालफाडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंद्रोज् संघाने  स्पोर्टिव्ह संघाचा 72 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

चंद्रोज्: 41.4 षटकांत सर्वबाद 129 धावा(अर्जुन शेळके नाबाद 38(54,2×4), श्रवण गालफाडे 22(28,4×4), विराज वासुदेवन 20(56,4×4), वीर चोरडिया 3-23, शश्रीक दत्ता 2-7 , अर्जुन एस 1-14, ईशान घाटणेकर 1-16) वि.वि स्पोर्टिव्ह: 24.5 षटकांत सर्वबाद 57 धावा (सॅम के 12, दर्शिल वाघेला 2-9, सर्वेश वाघमारे 2-13, अर्जुन शेळके 2-14, श्रवण गालफाडे 2- 16) सामनावीर- श्रावण गालफाडे

चंद्रोज् संघाचा 72 धावांनी विजय.

आर्यन्स: 50 षटकांत 7बाद 134 धावा (शौनक शेवडे 52(111,10×4), अर्णव पाटील नाबाद 24(56,4×4), प्रद्युमन कोळी 21(42,4×4), अर्जुन साळुंके 2-10, गुंजन सावंत 2-22) वि.वि यशवी: 26.4 षटकांत सर्वबाद 62 धावा(प्रेम ईघे 14, प्रद्युमन कोळी 7-19, आदर्श रावल 1-9, ओम वायकर 1-9) सामनावीर -प्रध्युमन कोळी

आर्यन्स संघाचा 72 धावांनी विजय