पिंपरी चिंचवड, १३ मे २०२३: भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल ला पैशाचे आम्हीच दाखवून वेश्याव्यवसाय मध्ये ओढणाऱ्या रॅकेटचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्पर्धा फास्ट केला वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा व्यवसाय व्यवसाय केला जात होता. वाकड मधील पंचतारांकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.
त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेने सापळा रचून, बनावट ग्राहक पाठवून, वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, वाकड येथील पंचतारांकित हॉटेल येथे रुम बुक करण्यास सांगितल्या.
यानंतर त्या ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला. दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, दलाल हा जवळच हाॅटेलच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणकरून दोन पिडीत महिला व एक दलाल आरोपीला ताब्यात घेवून वाकड पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद करण्यात आला. दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदरची एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उप-आयुक््त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक
प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अमंलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.