September 10, 2024

पीएमडीटीए जिल्हा 17 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वरद उंद्रे, स्वराज ढमढेरे, अर्जुन किर्तने, काव्या देशमुख, श्रेया पठारे यांचा मानांकित खेळाडूंवर विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 13 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए -17 वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत वरद उंद्रे, स्वराज ढमढेरे, अर्जुन किर्तने, काव्या देशमुख व श्रेया पठारे यांनी मानांकीत खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत बिगर मानांकीत वरद उंद्रेने अव्वल मानांकित अभिराम निलाखेला 7-5 असा तर सातव्या मानांकीत स्वराज ढमढेरेने दुस-या मानांकित नचिकेत गोरेला 7-2 असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली. आठव्या मानांकित अर्जुन किर्तने याने चौथ्या मानांकित दिव्यांग कवितकेचा 7-6(3) असा तर क्रिशांक जोशीने आर्यन किर्तनेचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात बिगर मानांकित काव्या देशमुखने तिस-या मानांकित निशिता देसाईचा 7-3 असा तर श्रेया पठारेने चौथ्या मानांकित वैष्णवी चौहाणचा 7-2 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत  प्रवेश केला. अव्वल मानांकित श्रुती नानजकरने अहना रहमानचा 7-0 असा तर दुस-या मानांकीत दुर्गा बिराजदारने स्वरा कोल्हेचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी: मुले: 
वरद उंद्रे वि.वि अभिराम निलाखे(1)  7-5
स्वराज ढमढेरे(7) वि.वि  नचिकेत गोरे(2) 7-2
अर्जुन किर्तने(8) वि.वि दिव्यांग कवितके(4)  7-6(3)
क्रिशांक जोशी वि.वि आर्यन किर्तने 7-5
मुली
श्रुती नानजकर(1) वि.वि अहना रहमान 7-0
दुर्गा बिराजदार(2) वि.वि स्वरा कोल्हे 7-5
काव्या देशमुख वि.वि निशिता देसाई (3) 7-3
श्रेया पठारे वि.वि वैष्णवी चौहाण (4) 7-2