July 24, 2024

इन्फ्ंटस एफसी, आर्यन्स ब संघांचा चमकदार विजय

पुणे १२ मे २०२३ – द्वितीय-तृतीय श्रेणीच्या अॅस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेत इन्फंटंस एलाईट एफसी आणि आर्यन्स एस.सी. ब संघांनी चमकदार विजयासह आपली आगेकूच कायम राखली.
पिंपरी येथील डॉ. हेडगडेवार मैदानावर झालेलया सामन्यात शुक्रवारी इन्फटंस एफसी संघाने साई एफसी संघाचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले. सॅम्युएल डॅनिएलने १७व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सातच मिनिटांनी २४व्या मिनिटाला गोल करून सयद तल्हाने संघाची आघाडी भक्कम केली. पुढे हीच आघाडी कायम राखत इन्फटंस एफसी संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर आयर्न्स एस.सी. संघाने सुखाई एफसी संघावर ३-० असा सहज विजय मिळविला. सुखाई एफसी संघाने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. सुखाईच्या आक्रमक खेळाडूंना मारलेल्या किकमध्ये अचूकतेचा अभाव असल्याने त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. याचा फायदा आर्यन्सने उठवला. अभिषेक गोखलेने ७व्या मिनिटाला गोल करून खाते उघडले. त्यानंतर उत्तर्धात आर्यन्सने आपली गोलसंख्या वाढवली. ओमकार राणेने ४४व्या, तर श्रेयश राऊतने ४८व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय साकार केला.
निकाल –
इन्फंटस एलाईट एफसी २ (सॅम्युएल डॅनिएल १७वे, सयद तल्हा २४वे मिनिट) वि.वि. साई एफए ०
आर्यन्स एस.सी. ब ३ (अभिषेक घोडके ७वे, ओमकार राणे ४४वे मिनिट, श्रेयश राऊत ४८वे मिनिट) वि.वि. सुखाई एफसी ०