June 14, 2024

पीएमडीटीए जिल्हा 17 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वरद उंद्रे, शौनक सुवर्णा यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

पुणे, 12 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए -17 वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुस-या फेरीत वरद उंद्रे व शौनक सुवर्णा यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुस-या फेरीत बिगर मानांकीत वरद उंद्रेने सहाव्या मानांकीत मनन अग्रवाल याला 7-2 असा तर शौनक सुवर्णा याने पंधराव्या मानांकीत सिद्धांत कुलकर्णीला 7-1 असा पराभवाचा धक्का देत तिस-या फेरीत धडक मारली. अव्वल मानांकीत अभिराम निलाखेने  वेदांग चढ्ढाचा 7-1 असा तर दुस-या मानांकीत नचिकेत गोरेने रोहन बोर्डेचा 7-6(4) असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. तिस-या मानांकीत सनय सहानी याने अथर्व येलभरचा 7-4 असा तर चौथ्या मानांकीत दिव्यांग कवितकेने सक्षम भन्साळीचा 7-0 असा सहज पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: मुले: 
अभिराम निलाखे(1) वि.वि वेदांग चढ्ढा 7-1
नचिकेत गोरे(2) वि.वि रोहन बोर्डे 7-6(4)
सनय सहानी(3) वि.वि अथर्व येलभर 7-4
दिव्यांग कवितके(4) वि.वि सक्षम भन्साळी 7-0
वरद उंद्रे वि.वि मनन अग्रवाल(6) 7-2
अर्जुन कीर्तने(8) वि.वि रोहन चौहान 7-0
शिवम पडिया(9) वि.वि नील आंबेकर 7-2
स्वर्णिम येवलेकर(11) वि.वि पृथ्वीराज चौहान 7-0
सनत कडले(12) वि.वि सनील येनपुरे 7-0
शौनक सुवर्णा वि.वि सिद्धांत कुलकर्णी(15) 7-1
शौर्य बावस्कर वि.वि विहान धोका 7-0