पुणे, 13 जून 2023: सिहंगड वाहतूक विभागाच्या हद्दीत वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून विष्णू पुरम सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला ५० मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत भारती विद्यापीठ मुख्यद्वार ते भारती रुग्णालयाचे प्रवेशद्वार दरम्यान उत्तर-दक्षिण अंतर २०० फूट व रुंदी ३० फुट या सेवा मार्गावर नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. सिहंगड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेबाबतच्या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांना सूचना द्यावयाच्या असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २१ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी