May 20, 2024

पुणे: परिवहनचे उरुळी कांचन येथील शिबीर २६ जून रोजी

पुणे, 13 जून 2023: संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन येथे आयोजित शिबीर कार्यालय १४ जून ऐवजी २६ जून रोजी घेण्यात येणार आहे.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे येथून सोलापूर रोड मार्गे उरुळी कांचनकडे १४ जुन २०२३ रोजी प्रयाण करणार आहे. या दिवशी पुणे-सोलापूर महामार्गावरील इतर वाहतूक बहुतांश प्रमाणात बंद असते. त्यामुळे शिबीर कार्यालयामध्ये पोहोचताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे.

यास्तव ज्या उमेदवारांना अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन शिबीर कार्यालयातील १४ जून रोजीची अपॉइंटमेंट मिळालेली आहे अशा उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी २६ जून रोजी शिबीर कार्यालयाच्या पूर्वनियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.