October 13, 2024

शिवसृष्टीच्या प्रवेश शुल्कात बदल

पुणे, दि. ६ जून, २०२३ : महाराजा श्री शिवछत्रपतींच्या ३५० व्या राज्यारोहण वर्षाच्या शुभारंभानिमित्ताने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव (ब्रु) येथे उभ्या राहत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी दि. ३ मे ते ६ जून २०२३ दरम्यान विशेष सवलत जाहीर करण्यात आली होती.

ही सवलत योजना मंगळवार दि. ६ जून रोजी संपत असली तरी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने पुढील काही काळासाठी देखील सवलतीचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस प्रौढ व्यक्तींना रु. २५०/- शालेय विद्यार्थ्यांना रु. ८०/- तर दहाच्या गटात शिवसृष्टीस भेट देणाऱ्यांना प्रत्येकी रु. २००/- असे प्रवेश शुल्क राहील. मात्र शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेशमूल्य हे पहिल्याप्रमाणेच प्रौढ व्यक्तींस रु. ३५०/-, शालेय विद्यार्थ्यांना रु १२०/- तर पंचवीसच्या गटात येणाऱ्यास प्रत्येकी रु. २५०/- असे राहील.

महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा व अन्य शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रु. ५०/- प्रमाणे प्रवेशशुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या निधी संकलन व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली.