पुणे, ११/०३/२०२३: हिंदू धर्माच्या हितासाठी व्होट बँक हाच अंतिम पर्याय असून, त्यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे अत्यावश्यक आहे. धर्माचे हित साधणारा साधू असतो आणि मला तेच काम करायचे आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन धर्म रक्षणासाठी काम करावे, असे प्रतिपादन कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी केले. सभेच्या सुरुवातीला कालीचरण महाराज यांनी आपल्या खड्या आवाजात शिवतांडव स्तोत्र म्हणत उपस्थितांची मने जिंकली.
शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित धर्मजागरण सभेत कालीचरण महाराज बोलत होते. सनसिटी, सिंहगड रोड येथे झालेल्या सभेवेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे, अध्यक्षा मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पक्ष पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कालीचरण महाराज म्हणाले, “इस्लाम हेच हिंदूंवरील मोठे संकट आहे. लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद, बदनामी जिहाद, लँड जिहाद, युपीएससी जिहाद या माध्यमातून इस्लाम आपले हातपाय वेगाने पसरत आहे. पण हिंदू मात्र वर्णवाद, भाषावाद, प्रातंवाद, जातीवाद या बुरसटलेल्या गोष्टींमध्ये अडकून स्वतःचे विभाजन करीत बसला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आताच जागे होणे गरजेचे आहे.”
“सनातन हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म असून त्याची ईश्वरप्राप्तीचे ध्येय, पुनर्जन्मसिद्धांत आणि कर्मफलसिद्धांत ही तीन लक्षणे आहेत. या धर्माचे ध्येय साधण्याचे शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध आणि शीख हे सहा मार्ग आहेत. परंतु इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्मच नाहीत कारण त्यांच्याकडे हिंदू धर्माच्या लक्षणांपैकी एकही लक्षण अस्तित्वात नाही,” असे परखड मतही कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.
कालीचरण महाराजांनी सरकारी जनगणनेच्या आकडेवारीवर आक्षेप घेत सांगितले की, दररोज देशात ६५ हजार मुले जन्माला येतात. त्यापैकी ४० हजार मुले ही मुस्लिम आहेत. या वेगाने विचार केला तर वर्षाला मुस्लिमांची लोकसंख्या १ कोटी ४४ लाख इतकी वाढणार आहे. या वेगाचा विचार केल्यास लवकरच ते हिंदूंवर हावी होतील आणि भारताला इस्लामिक देश बनवून टाकतील.
यावेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरदभाऊ मोहोळ आणि स्वातीताई मोहोळ यांना शिवसमर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर हिंदुत्वाची बाजू मांडणारे पियुष कश्यप, चंद्रभूषण जोशी, उमेश खंडेलवाल, अमोल पवळे, राहुल चंदेल, ऋषिकेश मळेकर यांना सोशल मीडिया वॉरियर्स म्हणून गौरविण्यात आले. मंजुषा नागपुरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शिवव्याख्याते निलेश भिसे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक नागपुरे यांनी आभार मानले.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान