इमारत बांधकामासाइी लागणार्या स्टील मटेरियलसाठी आरोपी रामलखने तक्रारदाराकडून तब्बल ५० लाखांचा अॅडव्हॉन्स घेतला होता. लुसेंट स्टील प्रा. लिमी. या फर्मचे नावे ऑर्डर घेवुन स्टील न देता रामलखन पसार झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपीने त्याचे लुसेंट स्टील प्रा. लिमीटेड फर्म बंद करून १० महिन्यापासुन तो फरार होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासात आरोपी रामलखन कानपुर, उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलीस अंमलदार नामदेव गडदरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, पोलीस अंमलदार, बापु भुजबळ, सचिन रणदिवे, नामदेव गडदरे यांच्या पथकाने कानपुर गाठले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रामलखनला कानपूरमध्ये ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशीकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, नामदेव गडदरे, बापु भुजबळ, सचिन रणदिवे, तांदळे, काळे यांनी केली.
“इमारतीसाठी आवश्यक स्टीलची ऑर्डर घेउन आरोपीने ५० लाखांचा अॅडव्हॉन्स घेउन पलायन केले होते. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणातून माहिती काढून त्याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.” –
राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान