पुणे, २४/०६/२०२३: पुणे रेल्वे विभाग प्रवाशांना मूलभूत प्रवासी सुविधा देण्यात सतत प्रयत्नशील आहे.
जून महिना संपत आला असून देखील इतर वर्षीच्या तुलनेत या वर्षी वातावरणात खूप उष्णता आहे. अशा वेळी प्रवाशांना सुविधा देण्यासाठी विशेषतः सामान्य श्रेणीच्या डब्यांमधे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निःशुल्क पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी पुणे , कोल्हापूर, सातारा आणि मिरज स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दु दुबे , अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांचे नेतृत्वात व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या संयोजनाद्वारे रेल्वे विभागाकडून पुणे, कोल्हापूर, सातारा,मिरज, स्टेशनवर निःशुल्क शुद्ध व स्वच्छ पाण्याची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सातारा, मिरज स्टेशनवर ही सुविधा रेल्वे विभागाकडून राबवण्यात आली आहे तर पुणे स्टेशनवर ही व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक सहयोग माजी नगरसेवक श्री राजाभाऊ लायगुडे, सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत लायगुडे यांनी दिला आहे आणि कोल्हापूर स्टेशनवर आपल्या निःस्वार्थ मदतीद्वारे कोल्हापूर राजस्थानी महिला मंडळ यांनी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
More Stories
५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
‘त्या’ परिसरात पाण्याने नाही तर कोंबड्याच मास खाल्ल्याने रुग्ण वाढले: अजित पवार
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार