October 14, 2024

खेड शिवापूर परिसरात ५९ लाखांचा गुटखा जप्त, पुणे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 पुणे, दि.३/०४/२०२३ –  छुप्या पद्धतीने प्रतिबंधित अमली पदार्थाची विक्री  विक्री करणार्‍यांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार खेड शिवापूर परिसरात मोटारीतून गुटख्याची तस्करी करणार्‍याला पथकाने अटक केले. त्याच्याकडून ५५ लाख ६२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा, साडेतीन लाखांचा लाखांचा तंबाखू पान मसाला, दोन मोबाइल,  मोटार असा ६५ लाख १९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रमेश मोतीराम चौधरी (वय ३७ रा. श्रीरामनगर ता हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिबंधीत पदार्थ गुटखा वाहतूक आणि  विक्री करणार्‍याविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्रेते, तस्करांची माहिती काढण्यात येत होती. त्यावेळी २ एप्रिलला खेड शिवापूर परिसरात मोटारीतून गुटख्याची विक्री करणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.  त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित रमेश चौधरी याला ताब्यात घेत मोटारीतून  विमल कंपनीचा गुटख्याचे एक पोते  जप्त केले. त्याने  गुटख्याचा माल  शिंदेवाडी  गोदामतून आणल्याचे सांगत कोंढणपूर रोडवर श्रीरामनगर याठिकाणी आणखी एक गोदाम असल्याची माहिती दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन्ही गोदामाची तपासणी केली. त्याठिकाणी  विमल, आर.एम.डी., रजनीगंधा, राजनिवास, राजश्री, व्ही १ असा ५५ लाख ६२ हजार ७१२ रुपयांचा पान मसाला आणि ३ लाख ४५ हजारांची तंबाखू असा ५९ लाखांचा अमली पदार्थ जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर, एपीआय   महादेव शेलार,  एपीआय  मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सचिन घाडगे,  अजित भुजबळ,  गुरू जाधव,  गोरख पवार,  संतोष तोडकर यांनी केली.