November 2, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ५ एप्रिल रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन

पुणे: दि. ०३/०४/२०२३: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२व्या जयंतीनिमित्त   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातर्फे  अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना ग्रीन्सबोरो विद्यापीठाचे प्रा. डॉ. जेरेमी रिंकर यांचे विशेष व्याख्यान “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शांतात व संघर्ष व्यवस्थापन” या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे असतील तर मेलबर्न विद्यापीठातील ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिटयूटच्या डॉ. ब्रीजिड फ्रीमन व  फ्लेम्स विद्यापीठाचे प्रा. रॉजर लुई चर्चक म्हणून सहभागी होतील अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांनी दिली.

हे व्याख्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील यशवंतराव चव्हाण नॅशनल इन्स्टिटयूट फॉर इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स ऍनालिसिस (वाय सी -निसदा) ग्रंथालय -सभागृहात बुधवार ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे . तरी सर्वानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख   प्रा. डॉ. विजय खरे यांनी केले आहे.