October 3, 2024

सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जीएक्स वॉरियर्स, सीएमएस फाल्कन्स अ, एफसी शिवनेरी संघांचे विजय

पुणे, 23 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या फेरीत जीएक्स वॉरियर्स, सीएमएस फाल्कन्स अ, एफसी शिवनेरी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत एकतर्फी झालेल्या सामन्यात सीएमएस फाल्कन्स अ संघाने झेन एफसी संघाचा 6-0 असा धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून रोहिल भोकरे(15, 29मि.) याने दोन गोल, तर विकी राजपूत(5मि.), साहिल भोकरे(21मि.), जोएल लालरेमरुता(24मि.), शिबू सनी पेनल्टी(53मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात जीएक्स वॉरियर्स संघाने खडकी युनायटेड संघाचा 4-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. जीएक्स वॉरियर्स संघाकडून फवाद धुंडवारे(27, 57मि.) याने दोन गोल तर, जेफ्री डिसूझा(25मि.) व सौरभ थोरात(स्वयंगोल) 50मि) यांनी प्रत्येकी एक गोल केला. तिसऱ्या लढतीत सादिक शफी(58मि.) याने पेनल्टी किकवर नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर एफसी शिवनेरी संघाने रेड डेव्हिल्स संघाचा 1-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
सीएमएस फाल्कन्स अ: 6(रोहिल भोकरे 15, 29मि., विकी राजपूत 5मि., साहिल भोकरे 21मि., जोएल लालरेमरुता 24मि., शिबू सनी पेनल्टी 53मि.)वि.वि.झेन एफसी: 0;
जीएक्स वॉरियर्स: 4 (फवाद धुंडवारे 27, 57मि, जेफ्री डिसूझा 25मि, सौरभ थोरात(स्वयंगोल) 50मि)वि.वि.खडकी युनायटेड: 0;
एफसी शिवनेरी: 1 (सादिक शफी पेनल्टी 58मि)वि.वि.रेड डेव्हिल्स: 0.