December 13, 2024

पुणे: विषारी औषध पिउन कुटूंबातील तिघांकडून आत्महत्येचा प्रयत्न, जेष्ठाचा मृत्यू

पुणे, दि. २२/०५/२०२३: आर्थिक नैराश्यातून एकाच कुटूंबातील तिघांनी विषारी औषध पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एका जेष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हडपसरमधील फुरसुंगीत घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७२) असे ठार झालेल्याचे नाव आहे. जनाबाई सूर्याप्रकाश अबनावे (वय ६० ), चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१ सर्व रा. लक्ष्मी निवास,भोसले व्हिलेज, फुरसूंगी ) अशी उपचार सुरु असलेल्यांची नावे आहेत.

अबनावे कुटूंबिय फुरसुंगीत राहायला असून जनाबाई असाध्य रोगाने त्रस्त असून पती सुर्यप्रकाश घरीच असतात. त्यांचा मुलगा चेतनचा दोनवेळा घटस्फोट झाला असून, तो बेरोजगार आहे. आर्थिक नैराश्यातून सोमवारी तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्याचवेळी नातेवाईक घरी आल्यामुळे अबनावे कुटूंबियांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दिसून आले. त्यांनी नियत्रंण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने धाव घेतली. तिघांनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सूर्यप्रकाशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जनाबाई आणि चेतन यांच्यावर उपचार सुरु आहेत.