April 13, 2024

पुणे शहरात तयार घरांच्या मागणीत वाढ

पुणे, ०२/०७/२०२३: राहण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. त्यामध्ये तयार घरांच्या गमागणीतही वाढ झाली आहे. या संदर्भात बालेतांना रतन होम्सचे संचालक श्री. रामनिवास गुप्ता म्हणाले, बरेच लोक घरे बुक करतात आणि वर्षानुवर्षे ईएमआय भरतात, सोबत घरभाडे भरण्याच्या बोजा सोसावा लागतो. कारण एकीकडे त्यांना त्यांच्या घराचा ईएमआय भरावा लागतो, तर दुसरीकडे ते राहत असलेल्या घराचे भाडेही भरावे लागते.

हे सर्व टाळण्यासाठीच आज ग्राहक तयार घरे खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळेच तयार झरांच्या मागणीत वाढ झाली आहे. तयार फ्लॅट विक्रीची वाढती मांगणी पाहिता झपाट्याने वाढत असलेल्या पाषाण, सुस, सुतारवाडी, हिंजवडीतील रतन होम्स प्रोजेक्ट सारखे अनेक तयार फ्लॅट विक्री करण्यावर बांधकाम व्यवसायिक भर देत आहेत.

म्हणजे बुकिंग झाल्यावर ग्राहकांना त्वरीत ताबा दिला जातो. तसेच तयार फ्लॅट सोबत आसपासचे वातावरण, राहत असलेले नागरिक, अपाटमेंटची श्रेणी तपासता येते अशा अनेक बाबींचा ग्राहक विचार करत असतो. ज्या प्रमाणे ग्राहक तयार फ्लॅट खरेदीवर भर देत आहेत, ते पाहता तयार फ्लॅट करण्यावर बांधकाम व्यवसायिक पण भर देत आहेत, असेही रामनिवास गुप्ता यांनी नमुद केले.