October 14, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निकी पूनाचा याचा मानांकीत खेळाडूवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

पुणे, 26 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या वाईल्डकार्ड प्राप्त बिगर मानांकीत निकी कलियांदा पूनाचा याने फ्रान्सच्या सहाव्या मानांकीत जिओव्हानी मपेटशी पेरीकार्ड याचा पराभव करत अंतिम पात्रता फेरीत धडक मारली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन तास चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 719 असलेल्या भारताच्या बिगर मानांकीत निकी कालियांदा पूनाचा याने फ्रान्सच्या जागतिक क्रमांक 358 असलेल्या सहाव्या मानांकीत जिओव्हानी मपेटशी पेरीकार्ड याचा 6-7(5),6-4,6-4 असा पराभव करत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान पहिल्या पात्रता फेरीतच संपुष्टात आले. सर्बियाच्या दुस-या मानांकीत निकोला मिलोजेविक याने दिग्विजयप्रताप सिंग याचा 6-1,7-5 असा तर दक्षिण कोरियाच्या सातव्या मानांकीत युनसेंग चुंगने नितीन कुमार सिन्हाचा 6-2,6-2 असा सहज पराभव करत अंतिम पात्रता फेरी गाठली. स्पेनच्या आठव्या मानांकीत कार्लोस सांचेझ जोवरने निशित रहाणेचा 6-1, 6-1 असा तर नॉर्थ मारियाना आयलँडरच्या कॉलिन सिंक्लेअर याने एस.डी प्रज्वल देवचा 6-3,6-4 असा तर झिम्बाब्वेच्या बेंजामिन लॉकने मनीष सुरेशकुमारचा 2-6, 6-1,6-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या डेने केलीने सिद्धार्थ रावतचा 6-3, 6-2 असा तर रशियाच्या चौथ्या मानांकीत अलिबेक कचमाझोव याने चिराग दुहानचा असा पराभव करत अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी
जय क्लार्क(ग्रेट ब्रिटन)(1) वि.वि आर्थर वेबर(फ्रान्स) 7-6(3),6-2
निकोला मिलोजेविक(सर्बिया)(2) वि.वि दिग्विजयप्रताप सिंग(भारत) 6-1,7-5
अकिरा सँटिलन(ऑस्ट्रेलिया) वि.वि जेसन जंग(तैपैई)(3)6-4,1-1(सामना सोडून दिला)
अलिबेक कचमाझोव(रशिया)(4) वि.वि चिराग दुहान(भारत) 6-3, 6-3
निकी कलियांदा पूनाचा (भारत) वि.वि जिओव्हानी मपेटशी पेरीकार्ड (फ्रान्स) (6)6-7(5),6-4,6-4
युनसेंग चुंग (दक्षिण कोरिया) (7) वि.वि नितीन कुमार सिन्हा(भारत) 6-2,6-2
कार्लोस सांचेझ जोवर (स्पेन) (8) वि.वि निशित रहाणे (भारत) 6-1, 6-1
डोमिनिक पालन(झेक प्रजासत्ताक)(11) वि.वि पेट्र नौझा(झेक प्रजासत्ताक) 6-3, 6-4
कॉलिन सिंक्लेअर (नॉर्थ मारियाना आयलँडर) वि.वि एस.डी प्रज्वल देव (भारत) 6-3,6-4
बेंजामिन लॉक (झिम्बाब्वे) वि.वि मनीष सुरेशकुमार (भारत) 2-6, 6-1,6-1
डेने केली (ऑस्ट्रेलिया) वि.वि सिद्धार्थ रावत (भारत) 6-3, 6-2
माकोटो ओची (जपान) वि.वि कॅलम पुटरगिल ऑस्ट्रेलिय) 6-1, 6-2