October 14, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात

पुणे, 1 मार्च 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सुमित नागलला चेक प्रजासत्ताकच्या डॉमिनिक पालन कडून पराभवाचा सामना करावा लागला व त्यामुळे याबरोबरच एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 2तास 3मिनीट चाललेल्या सामन्यात भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्रमांक 387 असलेल्या सुमित नागल याला क्वालिफायर जागतिक क्रमांक 412 असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या डॉमिनिक पालन कडून 6-4, 3-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सेटच्या तिस-या गेममध्ये नागलने पालनची सर्व्हिस ब्रेक करत 2-1 अशी आघाडी घेतली व पहिला सेट 6-4 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटच्या दुस-या गेममध्ये पालनने नागलची सर्व्हिस ब्रेक करत आघाडी घेतली व आपली आघाडी कायम राखत दुसरा सेट डॉमिनिक पालन याने 6-3 असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. तिस-या सेटमध्ये सुरूवातीपासूनच पालनने वरचढ खेळ केला. या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये पालनने सुमीतची सर्व्हिस ब्रेक केली. सुमितला अखेरपर्यंत सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत पालनने सुमितविरुद्ध हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

तैपैई दुस-या मानांकीत जागतिक क्रमांक 131 असलेल्या चुन-सिन त्सेंग याने सर्बियाच्या हमाद मेदजेडोविक याचा 6-4, 6-4 असा तर इटलीच्या चौथ्या मानांकित लुका नार्डीने आपला सहकारी लोरेन्झो ग्युस्टिनो याचा 6-7(11), 6-0, 6-4 असा पराभव केला. जपानच्या आठव्या मानांकीत रिओ नोगुची याने सर्बियाच्या निकोला मिलोजेविक याचा 2-6, 7-5, 6-3 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डेने केली व युक्रेनच्या व्लादिस्लाव ओर्लोव यांचा 6-1, 7-5 असा तर मुकुंद शशिकुमार व विष्णु वर्धन जोडीने इटलीच्या फ्रांसेस्को मेस्ट्रेली व लुका नारदी यांचा 2-6, 6-3, 10-7 असा पराभव करत केला. भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनने सर्बियाच्या बोरिस बुटुलिजाच्या साथीत भारताच्या परीक्षित सोमानी व मनीष सुरेशकुमार यांचा एकतर्फी लढतीत 6-2, 6-2 असा पराभव करत दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या अर्जुन काढे व ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमिलियन न्यूक्रिस्ट या दुस-या मानांकीत जोडीने भारताच्या फैसल कमर व फरदीन कमर जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. भारताच्या पूरव राजा व चेक प्रजासत्ताकच्या पेट्र नौज़ा या चौथ्या मानांकीत जोडीने फ्रान्सच्या हेरोल्ड मेयो व जपानच्या मकोटो ओची यांचा 6-3, 6-2 असा पराभव करत दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ- दुसरी फेरी- एकेरी गट
लुका नार्डी (इटली) [4] वि.वि लोरेन्झो ग्युस्टिनो (इटली) 6-7(11), 6-0, 6-4
डॉमिनिक पालन (चेक प्रजासत्ताक) वि.वि सुमित नागल (भारत) 4-6, 6-3, 6-4
रिओ नोगुची(जपान)(8)वि.वि निकोला मिलोजेविक (सर्बिया) 2-6, 7-5, 6-3
चुन-सिन त्सेंग(तैपैई)(2)वि.वि हमाद मेदजेडोविक (सर्बिया) 6-4, 6-4

दुहेरी गट- पहिली फेरी
बोरिस बुटुलिजा (सर्बिया)/प्रजनेश गुणेश्वरन (भारत)वि.वि परीक्षित सोमानी/मनीष सुरेशकुमार (भारत) 6-2, 6-2
अनिरुद्ध चंद्रशेखर/एन विजय सुंदर प्रशांत (भारत) वि.वि डेने केली (ऑस्ट्रेलिया) / व्लादिस्लाव ओर्लोव (युक्रेन)6-1, 7-5
मुकुंद शशिकुमार /विष्णु वर्धन (भारत)वि.वि फ्रांसेस्को मेस्ट्रेली / लुका नारदी (इटली) 2-6, 6-3, 10-7
तोशिहिदे मत्सुई/काइतो उसुगी(जपान)(5) पुढेचाल.वि दिमितार कुझमानोव्ह (बल्गेरीया)/ मिलजन झेकिक(सर्बिया)
अर्जुन काढे (भारत)/मॅक्सिमिलियन न्यूक्रिस्ट (ऑस्ट्रिया)(2) वि.वि फैसल कमर/फरदीन कमर (भारत) 6-3, 6-4
पेट्र नौज़ा ( चेक प्रजासत्ताक )/पूरव राजा (भारत)(4) वि.वि हेरोल्ड मेयो (फ्रान्स)/मकोटो ओची (जपान) 6-3, 6-2
कॅलम पुटरगिल/ डेन स्वीनी (ऑस्ट्रेलीया) वि.वि कॅलम पुटरगिल/ डेन स्वीनी (ऑस्ट्रेलीया) 6-4, 3-6,10-7