June 24, 2024

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब, पीबीकेजेसीए संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, दि. 1 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात यश नाहर(184 व 90धावा, 3-47) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुना क्लब संघाने स्पोर्ट्समन संघाचा 104धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मंदार भंडारी(नाबाद 149धावा व 68धावा), मेहुल पटेल(105धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजेसीए) संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 46 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी स्पोर्ट्समन संघाने आज 21 षटकात 5 बाद 152धावापासून पुढे खेळ सुरु झाला. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना पूना क्लब संघाने 40 षटकात सर्वबाद 360 धावा केल्या. 10 गडी बाद झाल्यामुळे पुना क्लबची अंतिम धावसंख्या 310धावा(वजा50 धावा) झाली. याच्या उत्तरात स्पोर्टसमन संघाचा पहिला डाव 36 षटकात सर्वबाद 228 धावांवर संपुष्टात आला. 10 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 178धावा (वजा 50) झाली. यात अथर्व काळे 35, सिद्धेश वरघंटे 29, शंतनू केनट 56, शुभम हरपळे 20, जय पांडे 22, वैभव चौगुले 29 यांनी धावा केल्या. पूना क्लबकडून अखिलेश गवळे(3-54), सागर बिर्दवाडे(3-26), ओंकार आखाडे(1-44), यश नहार(1-3), धनराज परदेशी(1-44) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 132 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात पूना क्लब संघाने 20 षटकात 2बाद 185 धावा केल्या. 2 गडी बाद झाल्याने धावसंख्या 175धावा झाली. यामध्ये यश नाहरने 56चेंडूत 6चौकार व षटकाराच्या मदतीने 90धावा, अकिब शेखने 76चेंडूत 6चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 67 धावा केल्या. विजयासाठी 317 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या स्पोर्टसमन संघाला 19.5 षटकात सर्वबाद 253धावाच करता आल्या. 10गडी बाद झाल्याने धावसंख्या 203धावा(वजा50) झाली. यात वैभव चौगुले 51, जय पांडे 40, अभिजित साळवी 42,सिद्धेश वारघंटे 33, यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पूना क्लबकडून यश नाहर(3-47), सागर बिर्दवाडे(2-56), धनराज परदेशी(2-40) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 104 धावांनी विजय मिळवून दिला.

डीव्हीसीए मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी डीव्हीसीए संघाच्या 21 षटकात बिनबाद 161धावापासून खेळ पुढे सुरु झाला. याआधी काल
पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजेसीए) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात 40 षटकात 3बाद 310धावा केल्या. पण तीन गडी बाद झाल्यामुळे त्यांची अंतिम धावसंख्या 295धावा(वजा15 धावा) झाली. याच्या उत्तरात डीव्हीसीए संघाने 40 षटकात 6बाद 307 धावा केल्या. ६ गडी झाल्याने अंतिम धावसंख्या 277धावा (वजा 30) झाली. यात यश जगदाळे 83, किरण मोरे 82, मिझान सय्यद 32, शुभम पेसवाल 36 यांनी धावा केल्या. पीबीकेजेसीएकडून श्रीकांत मुंढे(2-43), अक्षय दरेकर(2-69), मेहुल पटेल(2-45) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 18 धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात पीबीकेजेसीए संघाने 20 षटकात 5बाद 211धावा केल्या. 5 गडी बाद झाल्याने धावसंख्या 186धावा झाली. यात मंदार भंडारी 68, दिग्विजय जाधव 47, किर्तीराज वाडेकर 27 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. विजयासाठी 229 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या डीव्हीसीए संघाला 20 षटकात 9बाद 203धावाच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 158धावा(वजा 45) झाली. यात किरण मोरेने सर्वाधिक 98 धावा केल्या. पीबीकेजेसीएकडून मेहुल पटेल(4-42), अक्षय दरेकर(2-16) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाला 46 धावांनी विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पूना क्लब मैदान: पहिला डाव: पूना क्लब: 40 षटकात सर्वबाद 310धावा (360-50 धावा) वि. स्पोर्टसमन: 36 षटकात सर्वबाद 178धावा (228-50 धावा)(अथर्व काळे 35, सिद्धेश वरघंटे 29, शंतनू केनट 56, शुभम हरपळे 20, जय पांडे 22, वैभव चौगुले 29, अखिलेश गवळे 3-54, सागर बिर्दवाडे 3-26, ओंकार आखाडे 1-44, यश नहार 1-3, धनराज परदेशी 1-44); पूना क्लब संघाकडेे पहिल्या डावात 132 धावांची आघाडी;

दुसरा डाव: पूना क्लब: 20 षटकात 2बाद 175धावा (185-10 धावा)(यश नाहर 90 (56, 6×4,6×6) अकिब शेख 67 (76, 6×4,1×6), अखिलेश गवळे नाबाद 23, मंथन पंडित 2-27) वि.वि.स्पोर्टसमन: 19.5 षटकात सर्वबाद 203धावा(253-50 धावा)(वैभव चौगुले 51(27), जय पांडे 40(28), अभिजित साळवी 42(21), सिद्धेश वारघंटे 33, यश नाहर 3-47, सागर बिर्दवाडे 2-56, धनराज परदेशी 2-40); पूना क्लब संघ 104 धावांनी विजयी;

डीव्हीसीए मैदान: पहिला डाव: पीबीकेजेसीए: 40 षटकात 3बाद 295धावा(310-15 धावा)(मंदार भंडारी नाबाद 149 (124,19×4,6×6), मेहुल पटेल 105 (122,15×4), इझान सय्यद 1 -41, अॅलन रॉड्रिग्ज 1-40, राहुल वारे 1-57) वि.डीव्हीसीए: 40 षटकात 6बाद 277धावा (307-30 धावा)(यश जगदाळे 83(98, 12×4), किरण मोरे 82(104,10×4,3×6), मिझान सय्यद 32(36,2×4), शुभम पेसवाल 36(21), श्रीकांत मुंढे 2-43, अक्षय दरेकर 2-69, मेहुल पटेल 2-45); पीबीकेजेसीए संघाकडे पहिल्या डावात 18 धावांची आघाडी;

दुसरा डाव: पीबीकेजेसीए: 20 षटकात 5बाद 186धावा(211-25धावा)(मंदार भंडारी 68(42,6×4,3×6), दिग्विजय जाधव 47(46, 6×4), किर्तीराज वाडेकर 27, कार्तिक शेवाळे 3-33, अॅलन रॉड्रिग्ज 1-36, मिझान सय्यद 1-41) वि.वि.डीव्हीसीए: 20 षटकात 9बाद 158धावा(203-45 धावा)(किरण मोरे 98(76), शुभम तैस्वाल 27, यश जगदाळे 27, अंश धूत 23, मेहुल पटेल 4-42, अक्षय दरेकर 2-16); पीबीकेजेसीए संघ 46 धावांनी विजयी.