October 14, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत जसक्रिकेट संघाचा विजय

पुणे, 3 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत जस क्रिकेट संघाने व्हिजन संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात अर्पण धरच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर जसक्रिकेट संघ 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अर्पण धर व भावेश मखिजा यांच्या अचूक गोलंदाजीने व्हिजन संघाचा डाव 39 षटकात सर्वबाद 130 धावांत रोखला. 130 धावांचे लक्ष रॉनी पोतदारच्या नाबाद 35, क्षितिज भालेरावच्या नाबाद 14, यशराज शिंदेच्या व ओम खुडे यांच्या प्रत्येकी 21 धावांसह जसक्रिकेट संघाने 17.3 षटकांत 5 बाद 132 धावांसह पुर्ण करत सामन्यात विजय मिळवला. 31 धावात 4 गडी बाद करणारा अर्पण धर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

व्हिजन: 39 षटकात सर्वबाद 130 धावा (विघ्नेश पेन्नेकर 18, आशय शेडगे 15, शर्विल गोसावी 15, अर्पण धर 4-31, भावेश मखिजा 1-6) पराभूत वि जसक्रिकेट: 17.3 षटकांत 5 बाद 132 धावा (रॉनी पोतदार नाबाद 35(34,6×4), यशराज शिंदे 21(17,2×4,1×6), क्षितिज भालेराव नाबाद 14(6,3×4), ओम खुडे 21(19,3×4,1×6), प्रद्युम्न कोंडावार 3-36, शिवेश तापकीर 1-21) सामनावीर -अर्पण धर

जसक्रिकेट संघ 5 गडी राखून विजयी