पुणे, दि. ०३/०३/२०२३: दुचाकी वेडीवाकडी का चालवतोस असे विचारत दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाकडील रोकड आणि गळयातील सोन्याचा गोफ हिसकावून नेला. ही घटना १ मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास वारजे माळवाडीत परिसरात घडली.
याप्रकरणी सोमनाथ बालाजी पांचाळ (वय ३८, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ हे १ मार्चला कामावरुन सुटल्यानंतर दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी वारजे पुल परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन थांबविले. तु वाकडी तिकडी गाडी का चालवतोस, असे म्हणत एका चोरट्याने सोमनाथच्या खिशातील १ हजार २०० रुपये आणि गळ्यातील ४० हजारांचा सोन्याचा गोफ असा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.
More Stories
५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
‘त्या’ परिसरात पाण्याने नाही तर कोंबड्याच मास खाल्ल्याने रुग्ण वाढले: अजित पवार
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार