पुणे, 27 फेब्रुवारी 2023: पुना क्लब गोल्फ कोर्स यांच्या वतीने आयोजित पुना क्लब गोल्फ लीग अजिंक्यपद स्पर्धेत अ गटात के के रॉयल्स संघाने 16 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले आहे.
स्वर्गीय जगन्नाथ शेट्टी यांच्या वैशाली रेस्टॉरंट यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी अ गटात किर्लोस्कर लिमिटलेस व मानव पारी पिन सिकर्स संघ 13.5गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
ब गटात व्हॅस्कॉन द होली वन्स संघ 17 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर, ऑटोमेक बेकर्स संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
स्पर्धेत 12 संघांनी आपला सहभाग नोंदवला असून सहभागी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक संघात 15 सदस्यांचा समावेश आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 180हून अधिक गोल्फ पटुनी आपला सहभाग नोंदवला आहे.

More Stories
Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई
पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड