October 14, 2024

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत पुना क्लब स्टार्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, पॉट ब्लॅक क्लब संघांची विजयी सलामी

पुणे,दि.27 फेब्रुवारी 2023 पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पुना क्लब स्टार्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, पॉट ब्लॅक क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत क गटात पुना क्लब स्टार्स संघाने क्यू मास्टर्स चॅलेंजर्स संघाचा 3-0 असा सहज पराभव करून शानदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पुना क्लबच्या माधव क्षीरसागरने क्यु मास्टर्स चॅलेंजर्सच्या मार्मिक भन्साळीचा 43-42, 59-13, 05-32, 71-20 असा तर, पुना क्लबच्या अश्रफ परवानीने वेदांत कोरेकर 01-00, 15-42-3, 35, 50-15 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात पुना क्लबच्या कुमार शिंदेने शक्ती चितळचा 40-42, 91-09, 41-14, 59-21 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

क गटात तहा खान, संकेत मुथा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट शुटर्स संघाने पीवायसी स्टार्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. ड गटात पॉट ब्लॅक क्लब संघाने क्यु मास्टर्स ब्लास्टर्स संघाचा 2-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून हरीश गायकवाड, कैवल्य जाधव यांनी सुरेख कामगिरी बजावली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, एटीसी ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे अतुल देशपांडे आणि ज्ञानेश लिमये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक सलील देशपांडे, अशोक शेट्टी, अरुण बर्वे, राजवर्धन जोशी, मनीष चौबळ, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. .

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
क गट: कॉर्नर पॉकेट शुटर्स वि.वि. पीवायसी स्टार्स 2-1(साद सय्यद पराभुत वि.सलील देशपांडे 27-43, 60-22, 12-37, 60-25, 37-46; तहा खान वि.वि.गौरव देशमुख 29-34, 64-55, 34-23, 66-37; संकेत मुथा वि.वि.योगेश लोहिया 55-09, 61-48, 30-02);

क गट: पुना क्लब स्टार्स वि.वि.क्यू मास्टर्स चॅलेंजर्स 3-0 (माधव क्षीरसागर वि.वि.मार्मिक भन्साळी 43-42, 59-13, 05-32, 71-20; अश्रफ परवानी वि.वि. वेदांत कोरेकर 01-00, 15-42-3, 35, 50-15; कुमार शिंदे वि.वि.शक्ती चितळे 40-42, 91-09, 41-14, 59-21).

ड गट: पॉट ब्लॅक क्लब वि.वि.क्यु मास्टर्स ब्लास्टर्स 2-1 (हरीश गायकवाड वि.वि.अजित शियुसरन 06-46, 61-10, 36-14, 80-44; कैवल्य जाधव वि.वि. अक्षय परेरा 41-22, 75-41, 57 01; गिरीश मोकाशी पराभुत वि.हेमंत ओसवाल 39-33, 29-48, 47-27, 33-63, 19-36)