July 22, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मॅक्स पर्सेल याला विजेतेपद

पुणे, 5 मार्च 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी  चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने  इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी  याचा  पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या 1 तास 18मिनीटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 155 असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने जागतिक क्रमवारीत 158 व्या स्थानी असलेल्या इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मॅक्सने पहिल्या सेटमध्ये पाचव्या व सातव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला.आपल्या खेळात सातत्य राखत मॅक्सने दुस-या सेटमध्ये पाचव्या व नवव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-3 असा जिंकत विजेतेपद पटकावले. मॅक्सने भारातात सलग चेन्नई, बेंगलुरू नंतर पुण्यात हे तिसरे विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे. एटीपी  चॅलेंजर मध्ये सलग तीन विजेतेपद पटकावत मॅक्स जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानावर पोहोचला आहे. मॅक्सने चेन्नई मध्ये अमेरीकेच्या निकोलस मोरेनो डी अल्बोरान याचा तर  बेंगलुरू येथे जागतीक क्रमांक 128 अलेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याचा पराभव केला होता.
स्पर्धेतील विजेत्या  मॅक्स पर्सेल याला  करंडक,  17,650 डॉलर व 100 एटीपी  गुण तर उपविजेत्या  लुका नार्डी याला  करंडक,  10,380 डॉलर व 60 एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली.  पारितोषिक वितरण पीएमआरडीए कमिशनर राहुल रंजन महीवाल,  एमएसएलटीएचे चेअसमन प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, शितल भोसले,  एटीपी सुपरवायझर आंद्रेई कॉर्निलोव्ह, एमएसएलटीएचे मानद सचिव  आणि स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर आदी मान्यवर  उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ-  अंतिम  फेरी- एकेरी गट:
मॅक्स पर्सेल (ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि लुका नार्डी (इटली) [4] 6-2, 6-3