पुणे, दि. ०५/०३/२०२३: चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या सराइतला चंदननगर पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने वडगाव शेरी परिसरातुन डिमोलो सर्व्हिस येथुन एक चंदनाचे झाड कापुन नेले होते.
सद्दाम बेसमिल्हादु लोद, वय – ३४ , रा. झेडपी शाळे जवळ, जंजाळा गाव, अंभाई, ता.सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर असे अटक केलेल्याचे नाव आहे.
चंदनचोरीच्या अनुषंगाने चंदननगर पोलीस तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत होते. त्यावेळी चंदन चोरी करणारी टोळी रिवार्डीयल रोड, नदी पात्रा लगत झाडाझुडपांमध्ये चंदनाचे झाड शोधत असुन, त्यांचेकडे एक पांढ-या रंगाचे पोते आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथक त्याठिकाणी पोहचले असता, दोघे जण पोलीस आल्याची चाहुल लागताच ते तेथुन पळुन गेले. त्यापैकी एक आरोपीला ताब्यात घेवुन, त्याचेकडे असलेल्या पांढ-या रंगाच पोत्यामध्ये दोन चंदनाचे झाडाचे खोड जप्त करण्यात आले. त्याने हे चंदन झाड डिमोलो सर्व्हिस स्टेशन येथुन चोरल्याची कबुली दिली.
आरोपीने वानवडी, चतुश्रृंगी, येरवडा , चंदन नगर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडुन १२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त. किशोर जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार,सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, नामदेव गडदरे, शेखरशिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विकास कदम, सुभाष आव्हाड व गणेश हांडगर यांनी केली.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर