May 11, 2024

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत मोहिल ठाकुर, एल्विस टॉम, वरदान कोलते, शरण्या प्रधान, अहाना गोडबोले यांची आगेकूच

पुणे, 1 सप्टेंबर 2023 ः पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात मोहिल ठाकुर, एल्विस टॉम, वरदान कोलते, रणवीर निकम यांनी तर, मुलींच्या गटात शरण्या प्रधान, अहाना गोडबोले यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित मोहिल ठाकूरने युवान गवळीचा 11-07, 11-03, 11-06 असा सहज पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित एल्विस टॉमने सहाव्या मानांकित सर्वेश जोशीचा 11-07, 11-05, 11-09 असा तर, चौथ्या मानांकित वरदान कोलतेने पाचव्या मानांकित नीरव मुळ्येचा 07-11, 11-09, 11-06, 05-11, 11-03 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित शरण्या प्रधानने श्रिया अनसिंगारचा 11-05, 11-02, 11-05 असा एकतर्फी पराभव केला. चौथ्या मानांकित स्पृहा बोरगावकरने शरण्या पटवर्धनवर 11-06, 11-03, 11-03 असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित अहाना गोडबोले हिने श्रीनिका उमेकरचा 11-06, 11-07, 08-11, 11-03 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचे उद्घाटन विद्या मुळ्ये, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोनकर पीवायसी हिंदु जिमखानाचे शिरीष साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मनिष चौबल, स्पर्धा संचालक अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
मोहिल ठाकूर(1) वि.वि.युवान गवळी 11-07, 11-03, 11-06;
 एल्विस टॉम(3) वि.वि.सर्वेश जोशी(6) 11-07, 11-05, 11-09
वरदान कोलते(4) वि.वि.नीरव मुळ्ये(5) 07-11, 11-09, 11-06, 05-11, 11-03;
रणवीर निकम वि.वि.धैर्य शहा 11-09, 05-11, 08-11 ,11-03, 13-11;
11 वर्षाखालील मुली:
शरण्या प्रधान(1) वि.वि. श्रिया अनसिंगार 11-05, 11-02, 11-05;
स्पृहा बोरगावकर (4) वि.वि.शरण्या पटवर्धन 11-06, 11-03, 11-03;
 अहाना गोडबोले (3)वि.वि.श्रीनिका उमेकर 11-06, 11-07, 08-11, 11-03;