April 29, 2024

तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत पश्चिम बंगालच्या सिमा मन्ना, सौविक मैतेई, सौविक दास, बरनाली कुंडू यांना विजेतेपद

पुणे, 3 सप्टेंबर 2023: अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित व अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत पश्चिम बंगालच्या सिमा मन्ना, सौविक मैतेई, सौविक दास, बरनाली कुंडू या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे आजपासून सुरू झालेल्या एनईसीसी, वेंकीज, व्हेनकॉब आणि ब्रिजस्टोन यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत 800 मीटर बाय-फिन्स वरिष्ठ महिला गटात पश्चिम बंगालच्या सिमा मन्नाने 11:20: 34सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, तामिळनाडूच्या प्रभा लक्ष्मी देवीसिगम व पश्चिम बंगालच्या रोमिता बिस्वास यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
पुरुष गटात पश्चिम बंगालच्या सौविक मैतेईने 08:51:49सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम बंगालच्या विक्रमादित्य झाने(09:08: 08सेकंद) याने दुसरा, तर केरळच्या पॉल अराम(09:17: 36सेकंद) याने तिसरा क्रमांक पटकावला.
400मीटर बाय-फिन्स ज्युनियर मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या सौविक दास(04:12: 61सेकंद)ने वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या बरनाली कुंडू(04:55: 18सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना खेळाडूंना पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आतंरराष्ट्रीय फिनस्विमिंग तज्ञ इजिप्तच्या इब्राहिम जेविदा,  रेफ्री दुबईच्या यास्मिन मुसा, अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार अचंता पंडित, अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ तमिळनाडूचे सचिव विजय कुमार आणि
अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ उत्तराखंडचे अध्यक्ष अनिल मेहेल यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत 30राज्यांतील 1200खेळाडूंनी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार):
800 मीटर बाय-फिन्स(वरिष्ठ महिला):
1.सिमा मन्ना(पश्चिम बंगाल, 11:20: 34सेकंद), 2.प्रभा लक्ष्मी देवीसिगम(तामिळनाडू,12:17: 37सेकंद), 3.रोमिता बिस्वास(पश्चिम बंगाल,12:39: 58सेकंद);
800 मीटर बाय-फिन्स(वरिष्ठ पुरुष):
1.सौविक मैतेई(पश्चिम बंगाल,08:51:49सेकंद), 2.विक्रमादित्य झा(पश्चिम बंगाल, 09:08: 08सेकंद), 3.पॉल अराम (केरळ,09:17: 36सेकंद);
400मीटर बाय-फिन्स(ज्युनियर मुले):
1.सौविक दास(पश्चिम बंगाल,04:12: 61सेकंद), 2.अर्जुन कांडोई(तेलंगणा,04:21: 28सेकंद), 3.सम्राट मिश्रा (पश्चिम बंगाल,04:25: 52सेकंद);
400 मीटर बाय-फिन्स(ज्युनियर मुली):
1.बरनाली कुंडू(पश्चिम बंगाल,04:55: 18सेकंद), 2.अनिसा बिस्वास (पश्चिम बंगाल,05:03: 15सेकंद), 3.कुसुम कुमवा(महा,05:04: 70सेकंद);