July 27, 2024

मुरली मोहोळ यांची लॉटरी मंत्रीपदी लागणार भरणे

पुणे, ९ जून २०२४ : पुणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णिला घेण्याची शक्यता आहे. मोहोळ यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान कार्यातून फोन आल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे मोहोळ यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव सुरू झाला आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निद्रानंतर गेले वर्षभर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे सव्वा लाख मताने निवडून येऊन संसदेमध्ये खासदार म्हणून गेले. राज्यभरात भाजपची दाणादाण उडालेली असून खासदारांची संख्या २३ वरून नऊ आलेली आहे त्यातही पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचे मोहोळ आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले या दोनच जागा निवडून आलेले आहेत. मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच खासदार होण्याची वेळ असताना त्यांच्या मंत्रिपदाबद्दल कोणतीही अपेक्षा केली गेलेली नव्हती. मात्र राज्यातील बदललेल्या समीकरणांमुळे आता मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा वेळी मराठा उमेदवार म्हणून मुरली मोहोळ यांचे महत्त्व वाढले आहे. मोहोळ यांच्याकडे सध्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राची प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी असल्याने पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यात त्यांच्या वारंवार दौरा झालेला आहे. या भागात त्यांनी त्यांचे संघटन वाढवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला संधी मिळालेली आहे असा संदेश मतदारांमध्ये जाणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदललेले असल्याने मुरलीधर मोहोळ यांना ही संधी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.