पुणे, दि.7 एप्रिल 2023 – बीपीसीएल यांच्या वतीने आयोजित व पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 43व्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत हरिमोहन सिंग, विनम्र आनंद, सुखमान सिंग आणि मिलिंद सोनी यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ओआयएल अ संघाने ग्रॉस आणि नेट अशा दोन्ही गटांमध्ये विजेतेपदाचा मान मिळविला.
पुण्यातील पूना क्लब गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या दोन दिवसीय स्पर्धेत सेव्हन अंडर अशी अफलातून कामगिरी करणाऱ्या हरिमोहन सिंगला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ग्रॉस गटात ओआयएल अ संघाने ४०५ दोषांकांची नोंद करताना पहिला क्रमांक पटकावला. तर ओआयएल ब संघाला ४९९ दोषांकांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नेट गटात ओआयएल अ संघाने ४०३ दोषांकांसह पहिले, तर ओआयएल संघाने ४११ दोषांकांसह दुसरे स्थान मिळविले.
यजमान एचपीसीएलच्या क संघाने दोन्ही गटांमध्ये चौथा क्रमांक मिळविला. मात्र त्यांच्या अ आणि ब संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही व त्यांची कालच्या क्रमांकांवर घसरगुंडी झाली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलच्या एचआर विभागाचे संचालक व वित्तीय विभागाचे संचालक व्हीआरके गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएसपीबीचे सहसचिव गौतम वडेहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक पारितोषिके
१) पटिंग स्पर्धा विजेता – अनुपम श्रीवास्तव (एचपीसीएल) ०.०८
२) बंकर शॉट विजेता – संजय कुमार (बीपीसीएल क) १ फूट
३) अॅव्हरेज बंकर शॉट विजेता हरिमोहन सिंग (ओआयएल अ) २.४५ फूट
४) अॅव्हरेज पिचिंग शॉट विजेता- सिमरजित सिंग (ओआयएल ब) ८ इंच ५) बेस्ट पिचिंग शॉट विजेता सिमरजित सिंग (होल)
६) लाँगेस्ट ड्राईव्ह – हरिमोहन सिंग (ओआयएल अ) ३५१ यार्ड
सविस्तर निकाल (पहिले ५ क्रमांक): ग्रॉस विभाग
१) ओआयएल अ (४०५)
२) ओआयएल ब (४१९ )
३) आयओसीएल अ (४७५)
४) बीपीसीएल क (५०१ )
५) ओआयएल क (५०७)
नेट विभाग
१) ओआयएल अ (४०३)
२) ओआयएल ब (४११)
३) जीएआयएल अ (४३१)
४) बीपीसीएल क (४३२)
५) आयओसीएल अ (४५१)
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान