May 17, 2024

जुना मुंबई -पुणे हायवेच्या कामाची आढावा बैठक – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, 06 मार्च 2024- जुना मुंबई पुणे हायवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याबाबत पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व सबंधित विभागाचे अधिकारी यांचेबरोबर आज (बुधवारी) सविस्तर बैठक घेण्यात आली.

बैठकीत जुना मुंबई पुणे हायवे रस्ता रुंदीकरणाचा आढावा घेण्यात आला, जय हिंद टॉकीजच्या पुढचा पट्टा लवकरच सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी मार्ग सुरु करण्याबाबत सकारत्मक चर्चा झाली. येत्या १० ते १५ मार्चपर्यंत हा रस्ता दुहेरी करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले असून. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना यातून लवकरच दिलासा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले.

दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, प्रकाश सोलंकी, राहुल दुर्गे, तसेच पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व पथ विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, खडकी छावणी परिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, खडकीचे व्यापारी व नागरिक बैठकीला उपस्थित होते.