June 24, 2024

शिवाजी महाराजांच्या राजलिपीत डिजिटल नाव तयार करण्याची ऑनलाईन संधी ऐतिहासिक, वैभवशाली “मोडी लिपी”मध्ये आपलं नाव तयार करा!

पुणे, ०५/०६/२०२३: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीचा प्रचार व प्रसार आजच्या डिजिटल युगातही वाढावा यासाठी राज्यभर एक स्तुत्य उपक्रम मोफत राबविला जात आहे. महाराजांची राजलिपी असलेल्या आणि सातशे वर्षांचा इतिहास असलेल्या मोडी लिपीच्या प्रचारासाठी आता अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मोडी लिपीच्या प्रसारासाठी तुम्ही तुमचे नाव या लिपीत सहजपणे तयार करू शकता, तेही ऑनलाइन आणि एका क्षणात.

ऐतिहासिक “मोडी लिपीमध्ये” मध्ये प्रत्येक नागरिकाला व्हाट्सअपवर अगदी काही सेकंदात डिजिटल नाव तयार करता येणार आहे. या उपक्रमास JioSh URL यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.

WhatsApp वर मोडी लिपीमध्ये नाव तयार करण्यासाठी लिंक https://jio.sh/eNav9 लिंकवर क्लिक करुन किंवा 9494114242 हा नंबर सेव्ह करून त्याला –

▪️ Hi मेसेज पाठवा.

▪️ आपले नाव टाईप करा

▪️ सेकंदात मोडी लिपी नावाची इमेज तयार होऊन WhatsApp वर मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घेतलेल्या निर्णयाच्या मागे एक विशेष योजना असायची! महाराजांनी सुरु केलेल्या योजना, नियोजने आजही खूप महत्वाची आहेत.

आजच्या पिढीला मोडी ही मायमराठीची एक जलद लेखनाची लिपी आहे, ही माहिती मिळावी. आजच्या तरुण पिढीला डिजीटल गोष्टी लगेच समजतात म्हणून ऐतिहासिक मोडी लिपीला डिजिटली उपलब्ध करुन तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आजच्या तरुण पिढीला छ. शिवाजी महारांजाच्या राजलिपीची माहिती व्हावी, तसेच मोडी लिपी बद्दल, वैभवाशाली समृद्ध इतिहासाबाबत तरुण पिढीच्या मनात एक आदरपुर्वक स्थान निर्माण व्हावे. यातूनच ऐतिहासिक मोडी लिपीचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे.

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि अर्थातच शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक योगदानाचा अनमोल ठेवा ज्या लिपीने जपून ठेवला आहे, ती मोडी लिपी आता आधुनिक युगात ‘डिजिटल’ रूपाकडे प्रवास करत आहे. इतिहासाचे अस्सल साधन मानली जाणारी मोडी लिपी आता कागदपत्रांपुरती मर्यादित राहिली नसून या लिपीने डिजिटल रुपडे घेऊन इंटरनेटवर बस्तान बसवले आहे.

असा आहे इतिहास: शिवपूर्वकाळातही होत असे मोडीचा वापर मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी आहे. मोडी लिपीचा वापर प्रामुख्याने मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्रलेखनासाठी झाला. लेखन करताना शक्यतो हात न
उचलता एका लेखणीच्या टाकाने थोडक्या वेळात पुष्कळ मजकूर लिहिता येत असे. तत्कालीन लेखन जलद गतीने करण्यासाठी मोडीचा वापर होत असे. राजकीय, आर्थिक, महसुली, न्यायालयीन दस्तऐवजासाठी तसेच सरकारी व खासगी पत्रव्यवहार यासाठी मोडी लिपीचा वापर होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता. शिवपूर्वकाळात मोडीचा वापर झाला होता आणि शिवकाळानंतरही मोडीचा वापर सुरू होता, असे मोडी अभ्यासक आणि संगणकतज्ज्ञ नवीनकुमार माळी म्हणाले.

१९५० च्या दशकात मोडीत निघालेली मोडी लिपी, आज मॉडीफाय होऊन परत आली आहे. तत्कालीन मुद्रण तंत्रज्ञानाला मर्यादा होत्या. हस्तलिखित मोडीच्या प्रत्येक अक्षराचे फाँट तयार करणे अशक्य होते. पण आजच्या मुद्रण
तंत्रज्ञानाने हस्तलिखित मोडीचे सुंदर फाँट तयार झाले आहेत. आज आधुनिक डिजिटल युगात मोडी लिपीही आधुनिक होत आहे.

आजच्या युवापिढीला सर्व काही डिजिटल उपलब्ध आहे. म्हणून मोडी लिपी पण डिजिटली उपलब्ध झाली आहे. देवनागरी लिपीचा वापर करून केलेले टंकन मोडी लिपीमध्ये रुपांतरित करता येत आहे व टंकलिखित मोडी देवनागरी लिपीमध्ये रुपांतरित करता येत आहे. मोडी लिपीच्या डिजिटल वापराने मोडीला एक डिजिटल स्थान मिळेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोडी जलद गतीने पोहोचेल.