October 14, 2024

पूना क्लब रॅकेट लीग 2023 स्पर्धेत किंग्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 5 जून 2023- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित ग्रॅविटस फाउंडेशन प्रायोजित व कॉनव्हेक्स सहप्रायोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत किंग्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत किंग्स संघाने ऑल स्टार्स संघाचा 233-202 असा पराभव करून उपांत्य फेरीत पधडक मारली. बॅडमिंटन प्रकारात अजय शर्मा, कुमार पोरवाल, आनंद शहा, सारा नवरे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्स संघाने ऑल स्टार्स संघावर 62-56 असा विजय मिळवला. त्यानंतर स्क्वॅशमध्येbतुषार आसवानी, टोनी शेट्टी, आनंद शहा यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर किंग्स संघाने ऑल स्टार्सचा 49-39 असा पराभव करून आघाडी वाढवली. मात्र टेबल टेनिसमध्ये लैला अल्लाना, परम लुनावत, किरण संघवी, धीरेन शहा, मृणाल शहा, रशीद खोरशेदी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने किंग्सचा 65-50 असा पराभव ही आघाडी कमी केली. अखेर टेनिसमध्ये प्रांजली नाडगोंडे, सारा नवरे, नित्या शहा, राजेश बनसोडे, टोनी शेट्टी, तुषार आसवानी, रियान मुजगुले, होशेदार डेबू यांच्या उत्कृष्ठ खेळीच्या जोरावर किंग्स संघाने ऑल स्टार्स संघाचा 72-42 असा पराभव करून विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात शार्क्स संघाने लायन्स संघाचा 249-164 असा पराभव करून आगेकूच केली. बॅडमिंटनमध्ये शार्क्स संघाने लायन्स 59-53 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. स्क्वॅशमध्ये शार्क्स संघाला लायन्स संघाने 46-56 पराभूत केले. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये शार्क्स संघाने लायन्स संघावर 72-26 असा तर, टेनिसमध्ये शार्क्स संघाने लायन्स 72-29 असा पराभव करून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

किंग्स वि.वि.ऑल स्टार्स 233-202
बॅडमिंटन: किंग्स वि.वि.ऑल स्टार्स 62-56 (अजय शर्मा/कुमार पोरवाल वि.वि.विवान रांका/लैला अल्लाना 11-3; नित्या शहा/नील हळबे पराभुत वि.किरण संघवी/अमित परमार 07-15; प्रांजली नाडगोंडे/राजेश बनसोडे पराभूत वि. परम लुनावत/सनत परमार 13-15; आनंद शहा/सारा नवरे वि.वि.मृणाल शहा/आरुषी पांडे 31-23);

स्क्वॅश: किंग्स वि.विऑल स्टार्स 49-39 (तुषार आसवानी वि.वि.सोहेल संघवी 11-2; टोनी शेट्टी वि.वि.आयशा खन्यारी 15-01; आनंद शहा वि.वि.मृणाल शहा 15-05; नित्या शहा पराभुत वि.विवान रांका 08-31);

टेबल टेनिस: किंग्स पराभुत वि.ऑल स्टार्स 50-65(टोनी शेट्टी/कुमार पोरवाल वि.वि.आदिव शहा/सोहेल संघवी 11-04; नित्या शहा/राजेश बनसोडे पराभुत वि.लैला अल्लाना/परम लुनावत 06-15; भार्गव पाठक/संजय दिड्डी पराभूत वि.किरण संघवी/धीरेन शहा 14-15; अजय शर्मा/आनंद शहा पराभुत वि.मृणाल शहा/रशीद खोरशेदी 19-31;

टेनिस: किंग्स वि.वि.ऑल स्टार्स 72-42 (प्रांजली नाडगोंडे/सारा नवरे वि.वि.विवान रांका/आरुषी पांडे 11-05; नित्या शहा/राजेश बनसोडे वि.वि.किरण सोनवणे/किरण संघवी 15-05; टोनी शेट्टी/तुषार आसवानी वि.वि.डॅरियन माझदा 15-10; रियान मुजगुले/होशेदार डेबू वि.वि.सोहेल संघवी/अभिजीत गानू 31-22);

शार्क्स वि.वि.लायन्स 249-164
बॅडमिंटन: शार्क्स वि.वि.लायन्स 59-53(देव घुवालेवाला/नीरव बाफना वि.वि.अर्णव साठे/कुणाल संघवी 11-01; चैत्राली नवरे/प्रकाश भूतरा वि.वि.अवराज सिंग छाबरा/त्रिलोक थडानी 15-06; कृष्णा घुवालेवाला/युवल गुलाटी पराभूत वि.योगेश ठुबे/पंकज शहा 10-15; झिफन कोठावाला/उमीद कोठावाला पराभुत वि.मोक्षित पोरवाल/अमरजीत छाब्रा 23-31;

स्क्वॅश: शार्क्स पराभुत वि. लायन्स46-56 पराभूत (कृष्णा घुवालेवाला वि.वि.इरा मालवीया 11-04; झिफन कोठावाला पराभुत वि.अमान खान्यारी 03-15; शिशिर गुप्ता वि.वि.कुणाल संघवी 15-06; रंजित बाला पराभुत वि.योगेश ठुबे 7-31);

टेबल टेनिस: शार्क्स बीटी लायन्स 72-26 (कृष्णा घुवालेवाला/चैत्राली नवरे वि.वि.योगेश ठुबे/कुणाल संघवी 11-05; विवान पाटील/रोहित शर्मा वि.वि.अर्णव साठे/अव्राजसिंग छाबरा 15-04; देव घुवालेवाला/चेतन घुवालेवाला वि.वि.पंकज शहा/अमन खन्यारी 15-13; सुनील आशर/शिशिर गुप्ता वि.वि.ऋषिकेश अधिकारी/त्रिलोक थडानी 31-04);

टेनिस: शार्क्स बीटी लायन्स 72-29 (झायफन कोठावाला/युवल गुलाटी बीटी मोक्षित पोरवाल/अमान खानयारी 11-10; देव घुवालेवाला/शिशिर गुप्ता बीटी योगेश ठुबे/झील शाह 15-04; प्रकाश भूतरा/सांबुरा/बथरांजी रणजी पं. 15-07; कृष्णा घुवालेवाला/चेतन घुवालेवाला बीटी अवराज सिंग छाबरा/ऋषिकेश अधिकारी 31-08);